शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या दणक्यानंतर पालिकेने केले कल्याण- मलंगगड रस्त्याचे काम सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 17:34 IST

रस्त्याच्या कामांना अचानक भेटी देऊन काम गुणवत्तेनुसार होत आहे की नाही, याचा आढावा घेण्यास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सुरुवात केल्यानंतर कल्याण-डोंबिवली महापालिकेचे अधिकारी वठणीवर आले असून गुरुवारी कल्याण-मलंगगड रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली.

कल्याण - रस्त्याच्या कामांना अचानक भेटी देऊन काम गुणवत्तेनुसार होत आहे की नाही, याचा आढावा घेण्यास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सुरुवात केल्यानंतर कल्याण-डोंबिवली महापालिकेचे अधिकारी वठणीवर आले असून गुरुवारी कल्याण-मलंगगड रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. खा. डॉ. शिंदे यांनी काल, बुधवारी या रस्त्याला अचानक भेट दिली असता अनेक प्रकारची अनियमितता आढळली होती. तसेच आश्वासन देऊनही खड्डे भरण्याचे काम नीट होत नसल्याचे निदर्शनास आले होते. त्यावेळी अधिकारी आणि ठेकेदारांना फैलावर घेतल्यानंतर आजपासून कामाला योग्य प्रकारे सुरुवात करण्यात आली.कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांच्या दुरवस्थेसंदर्भात महापालिका आयुक्त पी. वेलारासू यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर खा. डॉ. शिंदे यांनी रस्त्यांची कामे सुरू असलेल्या ठिकाणांना अचानक भेटी देणे सुरू केल्यामुळे कामचुकार अधिकारी आणि ठेकेदारांचे धाबे दणाणले आहे. गेल्याच आठवड्यात त्यांनी कल्याण-मलंग रस्त्याला भेट देऊन निकृष्ट पद्धतीने होणारे काम थांबवले होते. काल बुधवारी पुन्हा त्यांनी महापौर राजेंद्र देवळेकर आणि शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी यांना घेऊन या रस्त्याची पाहणी केली असता मोठ्या प्रमाणावर अनियमितता समोर आली. प्रत्येक्षात कामच सुरू झाले नसल्याचे निदर्शनास आले होते. याबत त्यांनी महापालिका अधिकारी व ठेकेदार याना चांगलेच फैलावर घेतले होते.या रस्त्याच्या कामाच्या पाहणी दरम्यान विकासक, व्यावसायिक व महापालिकेचे अधिकारी यांची अभद्र युती समोर आली होती. महापालिका अधिकाऱ्यांनी प्रस्तावाप्रमाणे रस्त्याची रुंदी न घेता अनेक विकासकांची अनधिकृत बांधकामे व अनेक व्यावसायिकांची अनधिकृत दुकाने यावर कारवाई होऊ नये म्हणून मोजमापच चुकीचे केले असल्याचे पाहणीत उघड झाले होते. या सर्वांचा मनस्ताप हा येथील नागरिकांना होत असल्याच्या तक्रारी खा. डॉ.शिंदे यांच्यासमोर मांडल्या. यासंदर्भात आयुक्तांना पत्र देऊन अनधिकृत बांधकामांवर करवाई करून संबंधित महापालिका अधिकाऱ्यांवर व कंत्राटदारावर त्वरित कडक कारवाई व त्यांना निलंबित करण्याची मागणी खा. डॉ. शिंदे यांनी आयुक्तांकडे पत्राद्वारे केली होती. त्यावर आज रोजी लगेचच सदर रस्त्याचे काम सुरू झाले आहे. हा येथील नागरिकांचा विजय आहे. नागरिकांना चांगल्या सोयी- सुविधा मिळाव्यात, यासाठी चुकीच्या गोष्टींविरोधात मी सतत नागरिकांसोबत असणारच, असे खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका