शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
3
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
4
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
5
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
6
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
7
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
8
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
9
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
10
Viral Video : घर नव्हे हा तर अजूबा! अवघ्या ५२ इंचांच्या दोन मजली घरात डोकावून बघाल, तर हादरून जाल!
11
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
12
बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा
13
अतूट बंध! महागडे गिफ्टस नको तर 'या' ८ गोष्टींनी फुलवा नातं, आयुष्यभर राहा एकमेकांचे सोबती
14
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
15
नवरात्री २०२५: विनायक चतुर्थी कधी? व्रताचा संकल्प करा; गणपती पूजन ठरेल वरदान, कायम कृपा-लाभ!
16
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
17
Navratri 2025: नवरात्रीत लावलेला अखंड दिवा घालवतो 'अकाल मृत्यू'ची भीती; मात्र... 
18
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
19
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
20
आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर!

‘त्या’ चालकांचे आजपासून आंदोलन?

By admin | Updated: June 28, 2017 03:12 IST

केडीएमसीतील ठोकपगारी वाहनचालकांना तीन महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने त्यांनी सोमवारपासून कामबंद आंदोलनाचा निर्णय घेतला होता.

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : केडीएमसीतील ठोकपगारी वाहनचालकांना तीन महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने त्यांनी सोमवारपासून कामबंद आंदोलनाचा निर्णय घेतला होता. परंतु, प्रशासनाने मंगळवारी वेतन दिले जाईल, असे आश्वासन दिल्याने आंदोलन तूर्तास स्थगित केले होते. मात्र, त्यानंतरही वेतन न मिळाल्याने कर्मचाऱ्यांनी बुधवारपासून हे आंदोलन अटळ असल्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे. आयुक्तांची स्वाक्षरी न झाल्याने वेतन देता येत नसल्याचे सामान्य प्रशासन विभागाचे म्हणणे आहे. दरम्यान, स्वाक्षरीसाठी मंगळवारी तेथील अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली होती. शहरस्वच्छतेच्या घसरलेल्या मानांकनावरून सध्या सत्ताधाऱ्यांनी आणि प्रशासनाने ओला आणि सुका कचरा वर्गीकरणावर भर देण्याच्या दृष्टीने प्रबोधनाचे धडे नागरिकांना देण्यास सुरुवात केली गेली असताना दुसरीकडे ठोकपगारी वाहनचालकांना प्रशासनाकडून न्याय मिळणार तरी कधी?, असा सवाल उपस्थित होत आहे. केडीएमसी प्रशासनाने अ‍ॅन्थोनी वेस्ट हॅण्डलिंगचे कचरा गोळा करण्याचे दिले कंत्राट संपल्यानंतर २०११-१२ मध्ये ठोक पगारी तत्वावर १०५ वाहनचालकांना घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून नेमण्यात आले. त्यांना सहा महिन्यांची मुदतवाढ दिली जाते. परंतु, त्यांचा मुदतवाढीचा प्रस्ताव वेळेवर महासभेकडे पाठविला न गेल्याने दोन महिने हे वाहनचालक वेतनापासून वंचित राहिले होते. मात्र जूनमधील स्थगित महासभेत त्यांच्या मुदतवाढीला मान्यता मिळाली आहे. परंतु, याची अंमलबाजवणी आजवर न झाल्याने उपासमारीचे संकट त्यांच्यावर कायम आहे. आयुक्त पी. वेलरासू हे सध्या प्रशिक्षणासाठी मसुरीला गेले आहेत. सध्या त्यांचा अतिरिक्त कार्यभार नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त एन. रामास्वामी यांच्याकडे सोपवला आहे. परंतु, या महिनाभरात ते जेमतेम दोनवेळाच केडीएमसीत आले आहेत. त्यामुळे येथील कारभाराचे चांगलेच तीनतेरा वाजले आहेत. आयुक्तांच्या स्वाक्षरीविना वाहनचालकांचे वेतनही रखडले आहे. सोमवारी वेतन होईल, या प्रशासनाच्या आश्वासनानंतरही वेतनासाठी परवड कायम राहिल्याने बुधवारपासून कामबंद आंदोलन छेडण्याचा निर्णय वाहनचालकांनी घेतला आहे.