शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

जुना रिक्षा स्टँड परत मिळविण्यासाठी शेअर रिक्षा चालकांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 16:00 IST

नव्या रिक्षा स्टँडच्या ठिकाणीसुध्दा कमी जागा दिल्याने आणि वाहतुक पोलिसांकडून मिळालेल्या चुकीच्या वागणुकीच्या विरोधात आज स्टेशन परिसरातील शेअर रिक्षा चालकांनी आंदोलन केले.

ठळक मुद्देशेअर रिक्षा चालकांच्या तीन लेनरिक्षा चालक झाले आक्रमक

ठाणे - ठाणे स्टेशन भागात जुना शेअर रिक्षा स्टँड परत मिळावा म्हणून काही रिक्षा चालकांनी आंदोलन केले. या वेळी घोषणाबाजीही करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी काही रिक्षा चालकांना ताब्यातही घेतले. परंतु यामुळे आता हा वाद आणखी चिघळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.                  अशोक टॉकीज जवळील खालील बाजूस यापूर्वी कळवा, विटावा या भागांकडे जाणारा रिक्षा स्टँड होता. परंतु यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता, तसेच या स्टँड बाबत वारंवार तक्रारीही प्राप्त झाल्या होत्या. तसेच हा मार्केट एरिया असल्याने येथेच रिक्ष लागल्याने पादचाऱ्यांना चालणेही कठीण होऊन जात होते. त्यामुळे मागील आठवड्यात वाहतुक पोलिसांनी येथील रिक्षा चालकांना अशोक टॉकीज समोरील जागा दिली. या ठिकाणी घोडबंदरकडे जाणाºया रिक्षांसाठी एक लेन देण्यात आली. तसेच कळवा, विटावासाठी एक लेन देण्यात आली. परंतु एका लेनमध्ये पाचच रिक्षा लावण्यास परवानगी देण्यात आली असल्याने आणखी एक लेन वाढविण्याची मागणी रिक्षा चालकांनी केली होती. त्यानंतर आणखी तिसरी लेन वाढविण्यात आली. परंतु या लेनमध्येही पाच रिक्षा लावण्यास परवानगी देण्यात आली होती. असे असतांना शनिवारी पाच रिक्षांच्या मागेसुध्दा काही रिक्षा लागल्याने त्या हटविण्यात याव्या अशी समज वाहतुक पोलिसांनी रिक्षा चालकांना दिली. परंतु ते न ऐकल्याने त्यांचा परवाना जप्त करण्यात आला. त्यामुळे संतप्त झालेल्या रिक्षाचालकांना पोलिसांच्या या कारवाईच्या विरोधात आंदोलन सुरु केल्या.तसेच या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी जुना रिक्षा स्टँड परत मिळावा यासाठीसुध्दा घोषणाबाजी करण्यास सुरवात केली. आधी जुन्या स्टँड वरुन हटविण्यात आले आणि पुन्हा नव्या स्टँडवर सुध्दा अशा पध्दतीने वागणुक दिली जात आहे, शिवाय कारण नसतांना एका रिक्षा चालकाला मारल्याने हे आंदोलन करण्यात आल्याची माहिती यावेळी संतप्त रिक्षा चालकांनी दिली. त्यामुळे जे पोलिसाने हात उगारला त्याच्या विरोधातही गुन्हा दाखल करावा अशी मागणीही यावेळी रिक्षा चालकांनी केली.पूर्वीच्या जागेवर तक्रारी होत्या, वाहतुक कोंडी होत होती. त्यामुळे त्यांना नवीन जागेत हलविण्यात आले आहे. परंतु याठिकाणी पाच रिक्षा लावण्याची परवानगी असतांनाही जास्तीच्या रिक्षा लागत होत्या. त्यामुळेच ही कारवाई करण्यात आली.(सुरेश लांभाते - वरीष्ठ पोलीस निरिक्षक, वाहतुक विभाग) 

टॅग्स :thaneठाणेauto rickshawऑटो रिक्षाStrikeसंप