शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

माउंट एव्हरेस्ट उतरताना गिर्यारोहक अंजली कुलकर्णी यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 04:52 IST

जगातील सर्वात उंच शिखर असलेल्या माउंट एव्हरेस्ट सर केल्यानंतर, खाली उतरताना प्रकृती ढासळल्याने भारतीय गिर्यारोहक अंजली कुलकर्णी यांचा मृत्यू झाला.

मुंबई/ठाणे : जगातील सर्वात उंच शिखर असलेल्या माउंट एव्हरेस्ट सर केल्यानंतर, खाली उतरताना प्रकृती ढासळल्याने भारतीय गिर्यारोहक अंजली कुलकर्णी यांचा मृत्यू झाला. मूळच्या मुंबईच्या असलेल्या ५४ वर्षीय अंजली यांनी पती शरद कुलकर्णी यांच्यासह एव्हरेस्टवर बुधवारी यशस्वी चढाई केली, परंतु उतरताना त्यांना श्वसनाचा त्रास झाला.एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी हवामान स्वच्छ होते, त्यामुळे अनेक गिर्यारोहकांनी एकाच वेळी एव्हरेस्ट सर करण्यास सुरुवात केली. यामुळे मार्गावर ट्रॅफिक जाम झाल्याची माहिती कुलकर्णी यांच्या मोहीम आयोजक अरुण टेÑक्सने दिली. दरम्यान, अंजली यांच्यासह डोनाल्ड लिन या अमेरिकन गिर्यारोहकाचाही मृत्यू झाला.थुप्डेन शेर्पा यांनी माहिती दिली की, ‘अंजली यांनी पती शरद यांच्यासह माउंट एव्हरेस्टची यशस्वी चढाई केली. मात्र, खाली उतरताना त्यांचे निधन झाले.’ रवींद्र कुमार यांच्या नेतृत्वात चढाई केलेल्या कुलकर्णी यांच्या चमूमध्ये एकूण ६ गिर्यारोहकांचा समावेश होता.अंजली यांच्या चढाईची शंका?विविध वृत्तसंस्थावर अंजली यांचा अपघात एव्हरेस्ट उतरताना झाल्याचे सांगण्यात आले, पण गिरीप्रेमी उमेश झिरपे यांनी, ‘अंजली यांचा अपघात एव्हरेस्ट चढाई करताना झाला,’ अशी माहिती दिली. ते म्हणाले की, ‘चढाई करताना कॅप ४ बाल्कनी येथे श्वसनाचा त्रास झाल्याने अंजली यांची प्रकृती बिघडली. त्यानंतर त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या वेळी नेपाळच्या बाजूने २७२, तर चीन-तिबेटच्या बाजूने १२५ असे ३९७ गिर्यारोहक एकाच वेळी एव्हरेस्ट सर करण्याचा प्रयत्न करत असल्याने ट्रॅफिक जाम झाले. शिवाय, आॅक्सिजनचे प्रमाणही कमी झाले. या वेळी नाशिकचे हितेंद्र व महेंद्र हे महाजन बंधूही चढाई करत होते. महेंद्र यांना स्नो ब्लाइंडचा तर हितेंद्र यांनाही श्वसनाचा त्रास झाल्याने दोघांना रात्री बेस कॅम्पवर आणण्यात आले.’

टॅग्स :Everestएव्हरेस्ट