शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

मोटरमनने वाचवले जखमी प्रवाशाचे प्राण; मध्य रेल्वे प्रशासनाकडून सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 04:44 IST

ठाकुर्ली स्थानकातील घटना

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील ठाकुर्ली स्थानकात मोटरमन ए. आर. वर्मा आणि गार्ड पी. सी. पेडेकर यांनी रेल्वे रुळावर जखमी अवस्थेत पडलेल्या प्रवाशाचे प्राण वाचविले. १ जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. वर्मा यांनी याआधी डोंबिवली येथे जखमी अवस्थेत रेल्वे रुळांवर पडलेल्या प्रवाशाचे प्राण वाचविले होते. त्यामुळे त्यांचा मध्य रेल्वे प्रशासनाने सन्मान केला.मध्य रेल्वे मार्गावर बुधवार, १ जानेवारीला सायंकाळी ७ च्या सुमारास ठाकुर्ली स्थानकात कल्याण दिशेकडील लोकल आली. ही लोकल जलद मार्गावरून जात होती. मात्र या वेळी रेल्वे रुळावर एक तरुण जखमी अवस्थेत पडल्याचे मोटरमन वर्मा यांच्या लक्षात आले. वर्मा यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ आपत्कालीन ब्रेकद्वारे लोकल थांबविली. त्यानंतर तातडीने या दुर्घटनेची माहिती संबंधित विभागाला दिली. गार्ड आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांची मदत घेतली.मोटरमन ए. आर. वर्मा यांनी गार्ड पेडेकर यांच्या व अन्य जवानांच्या मदतीने जखमी प्रवाशाला फलाटावर आणले. कार्तिक सिंह (३५) असे या प्रवाशाचे नाव आहे. तो दिवा येथील रहिवासी आहे. त्याना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. वर्मा यांच्या प्रसंगावधानामुळे सिंह याला जीवनदान मिळाले.याआधी २३ डिसेंबरला वर्मा यांनी डोंबिवली स्थानकात रेल्वे रुळावर जखमी अवस्थेत पडलेल्या एका प्रवाशाचे प्राण वाचविले होते. वर्मा यांच्या प्रसंगावधानाचे कौतुक करीत मध्य रेल्वेचे मुंबई विभागीय व्यवस्थापक शलभ गोयल यांनी त्यांचा सन्मान केला.प्रवाशाने हात गमावलाआंबिवलीहून सीएसएमटी दिशेकडे जाणाऱ्या लोकलमध्ये बुधवारी सायंकाळच्या सुमारास कार्तिक सिंह प्रवास करीत होता. तो लोकलच्या दरवाजावर उभा होता.लोकल ठाकुर्ली-डोंबिवलीदरम्यान आली असता, लोकलच्या खांबाला धरून उभ्या असलेल्या कार्तिकचा हात सटकला आणि तो रेल्वे रुळावर पडला. त्याच्यावर डोंबिवली येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र त्याच्या डाव्या हाताला गंभीर इजा झाल्याने हात कापण्यात येणार आहे. कार्तिक झवेरी बाजार येथील ज्वेलर्सच्या दुकानात कारागीर आहे, अशी माहिती कार्तिकचा भाऊ निर्मल साहू यांनी दिली.

टॅग्स :central railwayमध्य रेल्वे