शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

मोटार विक्रीतील चोराच्या उलट्या बोंबा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 03:27 IST

देशभरात गुन्हे दाखल असलेल्या वकील ऊर्फ राजू रामकरण मिश्रा (४६) याने स्वत:चाच सहकारी अजय ललित यादव (४०) विरुध्द एका मर्सिडिज गाडीचे पैसे न देता विक्री करुन फसवणूक केल्याचा गुन्हा भार्इंदरच्या नवघर पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.

- धीरज परब मीरा रोड : वापरलेल्या महागड्या विदेशी गाड्यांच्या विक्रीत अनेकांची फसवणूक केल्याबद्दल देशभरात गुन्हे दाखल असलेल्या वकील ऊर्फ राजू रामकरण मिश्रा (४६) याने स्वत:चाच सहकारी अजय ललित यादव (४०) विरुध्द एका मर्सिडिज गाडीचे पैसे न देता विक्री करुन फसवणूक केल्याचा गुन्हा भार्इंदरच्या नवघर पोलीस ठाण्यात दाखल केला आहे. अगोदरच्या गुन्ह्यांमध्ये अजय व वकील एकत्र आरोपी आहेत. मिश्राने आतापर्यंत अनेक राजकारणी, व्यापारी आदी बड्या धेंडांना कोट्यवधी रुपयांना गंडवले आहे.गीता नगर फेज - ८ मध्ये राहणाऱ्या वकील मिश्राचे मीरारोडच्या क्वीन्स पार्क भागात पूजा आॅटो या नावाने गाड्यांच्या खरेदी - विक्रीचा व्यवसाय आहे. ठाण्याच्या संदीप नंदकुमार साळवी यांना त्याने मर्सिडिज मोटार ४५ लाखांना विकून देतो असे सांगितले. त्या गाडीचा सौदा मिश्राने काशिमीरा भागातील शिवसेनेचे अविनाश पाटील यांच्याशी केला. पाटील यांच्या खात्यातून साळवी यांच्या ओमकार कन्स्ट्रक्शनच्या खात्यात ७ लाख रुपयांचा धनादेश जमा झाला. उर्वरीत पैसे मिश्रा व त्याचा सहकारी यादव याला मानकुबाई चाळ, काशिमीरा नाका येथे दिल्याचे पाटील यांचे म्हणणे आहे. पैसे देऊनही गाडीची कागदपत्रे देत नसल्याने पाटील यांनी तक्रार केली. दरम्यान पाटील यांनी ती गाडी आपल्या नात्यातल्यांनाच दिली. आता मिश्रा याने सहकारी यादव विरोधातच नवघर पोलिसांकडे तक्रार दिली असून यादवने मर्सिडिजचे पैसे न देता ती परस्पर विकल्याचा गुन्हा दाखल केला. अपर पोलीस अधीक्षक प्रशांत कदम यांनी मिश्राच्या तक्रारीवरुन नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राम भालसिंग यांना कारवाईचे आदेश दिले. पोलिसांनी यादव याला अटक केली असून मर्सिडिज जप्त केली आहे.>संगनमताची शक्यतावकील मिश्रा, अजय यादव यांनी अनेक राजकारणी, उद्योजकांना विदेशी बनावटीच्या गाड्या देतो, असे सांगून त्यांची फसवणूक केली असल्याने व त्यांची पूर्वपीठिका लक्षात घेता मिश्राने केलेली यादव विरोधातली फिर्याद हाही संगनमताचा भाग असण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. या दोघांच्या सखोल चौकशीची मागणी फसलेल्या ग्राहकांनी केली आहे.