शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टर पडून आईचा मृत्यू, ४ मुली जखमी; भाईंदरमध्ये पहाटे घडली घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2023 10:27 IST

या घटनेची माहिती महापालिकेच्या अग्निशमन दलास सव्वाआठ वाजता मिळाली.

मीरा रोड : भाईंदरच्या उत्तन, पातान बंदर भागात शुक्रवारी पहाटे एका घराच्या छताचे प्लास्टर कोसळून आईचा मृत्यू झाला. तर, तिच्या चार मुली जखमी झाल्या आहेत. या घटनेनंतर घर रिकामे करण्यात आले आहे. 

मच्छीमार डेनिस बोर्जिस यांच्या एकमजली घरातील तळमजल्यावर त्यांची पत्नी सुनीता (४६) ह्या सोफ्यावर झोपल्या होत्या. तर, मुली स्नेहल (२५), श्वेता (१७), सानिया  (१३) आणि डेन्सी बॉर्जिस (२२) ह्या खाली झोपल्या होत्या. सर्वजण गाढ झोपेत असताना शुक्रवारी पहाटे सव्वाचार वाजता छताचे प्लास्टर कोसळले. त्यात सुनीता यांचा मृत्यू झाला. तर, चार मुली जखमी झाल्या. डेन्सी हिला दुखापत झाल्याने तिला स्टेला मॉरिस रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर, अन्य तिघींवर उपचार करून सोडण्यात आले. 

या घटनेची माहिती महापालिकेच्या अग्निशमन दलास सव्वाआठ वाजता मिळाली. अपर तहसीलदार नीलेश गौंड, तलाठी अनिता पाडवी, पोलिस निरीक्षक दादाराम कारंडे, अग्निशमन दलप्रमुख प्रकाश बोराडे, अग्निशमन केंद्र अधिकारी जगदीश पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. हे घर २० ते २२ वर्षे जुने असून तीन वर्षांपूर्वी त्याची दुरुस्ती केल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले. अपर तहसीलदार यांच्या निर्देशानंतर खबरदारी म्हणून घर रिकामे करण्यात आले आहे.