शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

४ वर्षांनी सापडली लेकराला आई; आईला पाहताच तो गळ्यात पडून ढसाढसा रडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 06:37 IST

मनोरुग्णालयाच्या प्रयत्नांना आले यश, वयाच्या ५४ व्या वर्षी ही महिला २०२० मध्ये हरवली. तिच्या कुटुंबीयांनी भांडूप पूर्व पोलिस स्थानकात हरवल्याचा गुन्हा १६ एप्रिल २०२० रोजी नोंदवला.

ठाणे - ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयातून गेलेला फोन खणखणला... तुमची आई आमच्याकडे आहे आणि ती बरी झालेली आहे... हे शब्द कानावर पडताच आई जिवंत आहे यावर सुरुवातीला त्याचा विश्वास बसला नव्हता...त्याने व्हिडीओ कॉलवर आईला पाहिले आणि तिच्या लेकराची उत्कंठा शिगेला पोहोचली. अक्षरश: धावत पळत आपल्या आईला घ्यायला तो मनोरुग्णालयात पोहोचला. आपल्या आईला पाहून तो ढसढसा रडू लागला. आईनेदेखील आपल्या पोटच्या पोराला ओळखले. चार वर्षांनंतर हरवलेल्या आईची आपल्या लेकरासोबत भेट झाली. ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नेताजी मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली या आईची घरवापसी गुरुवारी झाली. 

वयाच्या ५४ व्या वर्षी ही महिला २०२० मध्ये हरवली. तिच्या कुटुंबीयांनी भांडूप पूर्व पोलिस स्थानकात हरवल्याचा गुन्हा १६ एप्रिल २०२० रोजी नोंदवला. भरकटलेल्या अवस्थेत ती काही दिवसांनी वालीव पोलिस स्टेशन परिसरात सापडली.  त्यांनी वसई विरार मनपा बहुउद्देशीय निवारा संस्थेत महिलेस दाखल केले. तिची मानसिक अवस्था ठीक नसल्याचे लक्षात आल्यावर २७ सप्टेंबर २०२४ रोजी तिला ठाण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले. तिला विस्मरणाचा त्रास होत असल्याचे लक्षात आले. मनोरुग्णालयातील मानसोपचारतज्ज्ञ आणि कर्मचाऱ्यांनी तिला उपचार देऊन बरे केले.

असा घेतला मुलाचा शोध... समाजसेवा अधीक्षका नितीन शिवदे यांनी तिच्या कुटुंबीयांचा शोध घेतला. तिने वाळवा तालुका, जिल्हा सांगली असे सांगितले. तिथे चौकशी केले असता हे कुटुंब मुंबईत स्थलांतरित झाल्याचे सांगण्यात आले. नंतर तिने भांडूप सांगितले. मग शिवदे यांनी भांडूपमधील सर्व चाळींची नावे शोधून काढली. ती एकेक खुण सांगायला लागली. तिने ती साईनगरची असल्याचे सांगितले. तेथे चौकशी केल्यावर ती चाळ पुनर्विकासासाठी गेल्याचे सांगण्यात आले. मुलांची नावे मात्र तिला आठवत नव्हती. वेगवेगळी नावे घेतल्यावर तिने मुलाचे नाव ओळखले. मग त्या नावावरून मुलाचा फेसबुकवर शोध घेतला. 

आईला शेवटपर्यंत सांभाळणारआईला शेवटपर्यंत सांभाळणार आहे. तिचा खूप शोध घेतला. तिचा शोध लागत नसल्याने निराशा झालो; पण पत्नी सारखी म्हणत होती आई पुन्हा येतील आणि तेच झाले, असे मुलाने सांगितले. डॉ. मुळीक यांनी पुढे आईची कशी काळजी घ्यावी, याचे मार्गदर्शन तिच्या मुलाला केले.