शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मोपलवार खंडणी प्रकरण: सतीश मांगलेच्या बॉडीगार्डला अटक, मेहुण्यालाच नियुक्त केले सुरक्षारक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 03:11 IST

वरिष्ठ सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्याकडे खंडणीची मागणी करणा-या सतीश मांगले याच्या बॉडीगार्डला ठाणे खंडणीविरोधी पथकाने शनिवारी अटक केली. अतुल तावडे (२६, रा. नालासोपारा) असे त्याचे नाव असून, तो सतीश याच्या पहिल्या पत्नीचा भाऊ असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ठाणे : वरिष्ठ सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्याकडे खंडणीची मागणी करणा-या सतीश मांगले याच्या बॉडीगार्डला ठाणे खंडणीविरोधी पथकाने शनिवारी अटक केली. अतुल तावडे (२६, रा. नालासोपारा) असे त्याचे नाव असून, तो सतीश याच्या पहिल्या पत्नीचा भाऊ असल्याची माहिती पोलिसांनी दिली.मोपलवार यांच्याकडे १० कोटींची खंडणी मागणा-या मांगले आणि दुसरी पत्नी श्रद्धा यांना पोलिसांनी गुरुवारी रात्री अटक केली. शनिवारी सकाळी अतुल याला डोंबिवलीतून अटक केली. अतुल हा मागील १४ महिन्यांपासून सतीशचा बॉडीगार्ड म्हणून त्याच्यासोबत वावरत होता, तसेच तो मोपलवार यांच्यासोबत झालेल्या तिन्ही बैठकांमध्ये सहभागी होता. मांगले याने मोलपवार यांच्याविरोधात विविध सरकारी कार्यालयांत केलेले अर्ज पोहोचवणे व त्याचा जेवणाचा डबा आणून देण्याचे काम अतुल करत होता. काही दिवसांपूर्वी अतुलने सातारा पोलिसांकडे आपले अपहरण झाल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर, नालासोपारा येथे राहणारा अतुल हा मांगलेचा बॉडीगार्ड म्हणून त्याच्यासोबत फिरायचा. खंडणीवसुलीच्या प्रकरणात अतुल याचा सकृतदर्शनी सहभाग दिसून आल्याने पोलिसांनी त्याला अटक केली. ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केल्यावर त्याला ८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली.उकळलेले पैसे हस्तगत करणार!प्रायव्हेट डिटेक्टिव्हचे काम करताना मांगले याने किती जणांकडून अशा पद्धतीने खंडणी उकळली, याचा शोध सध्या पोलीस घेत असून, त्याच्याकडून उकळलेले पैसे हस्तगत करू, असा विश्वास एका वरिष्ठ अधिकाºयाने वर्तविला.आणखी काहींना होणार अटकखंडणीवसुलीच्या या प्रकरणात आतापर्यंत तिघांना अटक झाली असली, तरी मांगलेचा साथीदार अनिल वेदमेहता हा अद्याप फरार आहे. त्याचा शोध सुरू असून, त्याच्यासह आणखी चार ते पाच जणांचा या खंडणीवसुलीच्या रॅकेटमध्ये सहभाग असण्याची शक्यता आहे. त्या साºयांनाच लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :ArrestअटकCrimeगुन्हा