शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

गणरायाला दिला भावपूर्ण निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 00:54 IST

अंबरनाथमध्ये गौरी गणपतीचे विसर्जन उत्साहात झाले. पावसाने विश्रांती घेतल्याने भाविकांना विसर्जनाच्यावेळी कुठलाही अडथळा आला नाही.

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये गौरी गणपतीचे विसर्जन उत्साहात झाले. पावसाने विश्रांती घेतल्याने भाविकांना विसर्जनाच्यावेळी कुठलाही अडथळा आला नाही. सर्वाधिक गणेशमूर्तींचे विसर्जन हे चिंचपाडा येथील तलाव आणि शिवमंदिर येथील कुंडात करण्यात आले.सायंकाळी ५ नंतर पावसाने विश्रांती घेतल्याने अनेक घरगुती गणपती आणि गौरींचे विसर्जन झाले. फटाक्यांची आतषबाजी आणि पारंपारिक वाद्यांच्या तालावर नाचत मिरवणुका काढण्यात आल्या. ज्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले त्यात घरगुती गणपतींची संख्या सर्वाधिक होती. चिंचपाडा तलावात दोन ठिकाणी विसर्जनाची सोय केली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षेच्या उपाययोजना आखल्या होत्या. पोलिसांचाही चोख बंदोबस्त होता. मोठ्या वाहनांना मिरवणुकीच्या रस्त्यांवर बंदी घातली होती. तसेच भाविकांना गणेश विसर्जनासाठी पाण्यात उतरण्यास मनाई केली होती. मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी पालिका आणि सामाजिक संस्थांनी कार्यकर्ते ठेवले होते. प्रकाश व्यवस्थाही करण्यात आली होती. नगरसेवक प्रदीप पाटील आणि उमेश पाटील यांच्या वतीनेही विसर्जनाच्या ठिकाणी विशेष व्यवस्था केली होती.शिवमंदिर येथील कुंडातही पालिकेच्यावतीने विसर्जनाची सोय करण्यात आली होती. त्या ठिकाणीही भाविकांनी गणेशमूर्तींचे विसर्जन केले. सोबत जावसई तलाव, वडवली तलवातही विसर्जनाची सोय केली होती.विसर्जनासाठी उल्हास नदीचा पर्यायबदलापूर : बदलापूरमध्ये गौरीगणपतींचे मोठ्या उत्साहात विसर्जन झाले. बदलापूरमधील भाविकांनी विसर्जनासाठी उल्हास नदीचाच पर्याय निवडला. वाहते पाणी असल्याने आणि मूर्तीचे पावित्र्य टिकवण्यासाठी भाविकांनी उल्हास नदीच्या तीरावरच गर्दी केली होती.बदलापूरमध्ये रमेशवाडी परिसरातील उल्हासनदी चौपाटीवर विसर्जनासाठी भाविक आले होते. एरंजाड येथील उल्हासनदीच्या तीरावर देखील भाविकांनी गर्दी केली होती. ग्रामीण भागातील गणेशमूर्तीही याच ठिकाणी आणल्या होत्या. या सर्व ठिकाणी पालिकेच्या वतीचे सुरक्षेची व्यवस्था केली होती. कोणताही अपघात घडल्यास बचाव पथकही तैनात केले होते. कुळगावातील गावदेवी तलावातही भाविक मोठ्या संख्येने आले होते.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव