शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

ठामपा हद्दीतही महिनाभर सार्वजनिक शौचालय स्वच्छ मोहीम

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: December 1, 2023 17:25 IST

ठाणे महानगरपालिकेतर्फे महिनाभर शहरातील नऊ प्रभाग समितीतील सार्वजनिक शौचालये स्वच्छ करण्यासाठी मोहिम राबविण्यात येत आहे.

प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: केंद्रीय गृहनिर्माण आणि नगर विकास मंत्रालयाने जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून 25 डिसेंबरपर्यत देशव्यापी स्वच्छ शौचालय मोहिम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. स्वच्छ भारत मिशन अर्बन 2.0 आणि राज्य महाराष्ट्र मिशन अर्बन 2.0 यांच्या अंतर्गत ठाणे महानगरपालिकेतर्फे महिनाभर शहरातील नऊ प्रभाग समितीतील सार्वजनिक शौचालये स्वच्छ करण्यासाठी मोहिम राबविण्यात येत आहे.

ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. ही मोहिम अखंड सुरू रहावी यासाठी महापालिकेने २३ ते २६ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभाग आणि घनकचरा विभाग यांनी महापालिका कार्यक्षेत्रातील सार्वजनिक शौचालयाची तपासणी केली. त्यातून प्रत्येक प्रभाग समितीतील एक या प्रमाणे नऊ शौचालयांची निवड या मोहिमेसाठी केली आहे.  सार्वजनिक शौचालये ही नागरिकांना वापरण्यायोग्य, सहज उपलब्ध होतील म्हणजेच घरापासून जवळ, स्वच्छ, सुरक्षित आणि पर्यावरणस्नेही असतील या निकषांवर मोहिमेतील शौचालयांची निवड करण्यात आली आहे.

या मोहिमेतंर्गत ठामपाने निवड केलेल्या सार्वजनिक आणि वस्ती पातळीवरील शौचालयांची स्वच्छता आणि देखभाल करण्यासाठी 25 डिसेंबरपर्यत हा उपक्रम राबविला जाणार आहे. त्याचबरोबर, शहरातील सर्वच सार्वजनिक प्रसाधनगृहांच्या स्वच्छतेवर भर दिला जाणार आहे. तसेच नागरिकांनी देखील सार्वजनिक शौचालयाचा वापर केल्यानंतर शौचालय स्वच्छ ठेवणे देखील गरजेचे आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका