शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

पैसे घेतल्याच्या ‘त्या’ व्हिडिओची दखल: मुंब्य्रातील वाहतूक निरीक्षकासह ३९ अंमलदारांची तडकाफडकी बदली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2024 20:05 IST

पोलिस आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश: सहाय्यक आयुक्तांकडून होणार चौकशी.

ठाणे: एका वाहतूक मदतनीसाने पैसे घेतल्याचा एक व्हिडिओ सोशल मिडियाद्वारे व्हायरल झाल्याची गंभीर दखल वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. विनय राठोड यांनी घेतली आहे. याप्रकरणी सहायक पोलिस आयुक्तांमार्फत चौकशीचे आदेश राठोड यांनी दिले. ही चौकशी चालू असेपर्यंत मुंब्रा वाहतूक उपविभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश खेडेकर यांच्यासह ३९ पोलिस अंमलदारांची मुख्यालयात तडकाफडकी बदलीचे आदेश पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिले आहेत. या कारवाईमुळे संपूर्ण ठाणे पोलिस आयुक्तालयात वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

मुंब्रा वाहतूक उपविभागाच्या मदतनिसाकडून (ट्रॅफिक वॉर्डन) शिळफाटा याठिकाणी माेठया वाहन चालकांकडून अवैधरित्या पैशांची वसूली केली जात असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. याची गांभीर्याने दखल घेत वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. विनय राठोड यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर पोलिस आयुक्तांच्या आदेशाने वरिष्ठ पोलिस निरीक्षक खेडेकर यांच्यासह जमादार अखलाक पिरजादे, सुनिल गणपते, शांताराम बोरसे, अरमान तडवी, हवालदार माणिक पाटील, महेश भोसले आणि विजय बोरसे अशा ३९ अंमलदारांवर तडकाफडकी मुख्यालयात बदलीची कारवाई केली. या कारवाईने संपूर्ण मुंब्रा वाहतूक उपविभागच रिक्त झाला असून याठिकाणी इतर उपविभागातील कर्मचाऱ्यांना वर्ग केले जाणार आहे. तर वरिष्ठ पोलिस निरीक्षक खेडेकर यांच्या जागी आता उपायुक्त कार्यालयातील निरीक्षक समाधान चव्हाण यांची नियुक्ती झाली आहे. वाहतूक शाखेमध्ये एकाच वेळी संपूर्ण उपविभागावर कारवाई होण्याची ही बहुधा पहिलीच वेळ असल्याचे बाेलले जात आहे.

व्हायरल व्हिडिओनंतर कारवाई-एका व्हायरल व्हिडिओमध्ये या पोलिसांकडून शिळफाटा याठिकाणी अवजड वाहनांकडून अवैधरित्या पैशांची कथितपणे वसुली केली जात होती. हेच कारण देत या सर्वांची मुख्यालयात १७ फेब्रुवारी २०२४ रोजी चौकशी पूर्ण होईपर्यंत तात्पूरती बदली केली आहे. अशी वसूली खराेखर केली जात हाेती का? यामध्ये या उपविभागातील किती जणांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग आहे, याचीही चाैकशी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ‘एका वाहतूक वार्डनकडून पैसे घेतल्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाला हाेता. यामध्ये सहायक पोलिस आयुक्तांच्या मार्फतीने चौकशी केली जाणार आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत या अधिकारी कर्मचारी यांची तात्पूरत्या स्वरुपात मुख्यालयात बदली केली आहे.’डॉ. विनय राठोड, पोलिस उपायुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, ठाणे

टॅग्स :thaneठाणे