शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

धीम्या लोकलना १० ऑक्टोबरचा मुहूर्त?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2020 00:33 IST

मध्य रेल्वे : खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनाही प्रवासाची मुभा?

अनिकेत घमंडी।

डोंबिवली :मध्य रेल्वेवरील वाढती गर्दी कमी करण्यासाठी महिला विशेष लोकल सुरू झाल्यानंतर आता १० आॅक्टोबरनंतर धीमी लोकल सुरू करण्याच्या निर्णयावर रेल्वे व राज्य सरकार विचाराधीन आहे, अशी माहिती दोन्ही यंत्रणांमध्ये समन्वयक म्हणून जबाबदारी सांभाळणाºया अधिकाऱ्यांनी उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थेला दिली. दरम्यान, बुधवारपर्यंत संबंधित यंत्रणांच्या वरिष्ठांसमवेत बैठक होणार असून त्यात निर्णय होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले.

संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख, मनोहर शेलार म्हणाले की, ‘रेल्वेकडे महासंघाचा जूनपासून विविध मागण्यांसाठी पाठपुरावा सुरूच आहे. त्यानुसार, गुरुवारी एका अधिकाºयाने सांगितले की, पूर्वीप्रमाणे मध्य रेल्वेवर जलद, धीम्या लोकल पुढील आठवड्यानंतर धावतील. तसेच सध्याच्या लोकल फेºयांमध्ये आणखी वाढ करण्याचा निर्णय होऊ शकतो. त्यात खासगी क्षेत्रातील कर्मचाºयांनाही प्रवासाची मुभा देण्याचा विचार होऊ शकतो.’मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे हाच मुख्य उद्देश आहे. सामान्यांचे हाल सुरू असल्याने त्यासंदर्भातही सरकार गंभीर आहे. धीम्या लोकल सुरू झाल्यास जलद लोकल पूर्वीप्रमाणे धावतील. धीम्या लोकल सर्व स्थानकांत थांबणार असल्याने कर्जत, कसारा तसेच मुख्य मार्गावरील लहान स्थानकांतील प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. तसेच सध्या त्यांना इच्छित स्थानकापर्यंत प्रवास करताना करावा लागणार द्राविडी प्राणायाम थांबेल. तसेच वेळ व पैशांचा होणार अपव्यय टळेल, असे ते म्हणाले.विशिष्ट रंगसंगती, वेळेनुसार स्थानकात प्रवेश?खासगी कंपन्या, कार्यालये ३० टक्के कर्मचाºयांसह सुरू करण्याची परवानगी अनलॉक-५ मध्ये देण्यात आली आहे. त्यामुळे खाजगी क्षेत्रातील कर्मचाºयांना प्रवासाची संधी दिल्यास लोकलची गर्दी वाढेल. त्यासाठी गर्दी विभागण्यावर भर देण्यात येत आहे. त्यानुसार, एखाद्या मोबाइल अ‍ॅपद्वारे विशिष्ट रंगसंगती देऊन त्या रंगानुसार एक वेळ निश्चित केली जाईल. त्यावरून संबंधित कर्मचारी प्रवास करू शकेल. दरम्यान, या पद्धतीच्या अंमलबजावणीसाठी सुरक्षा यंत्रणेसोबत चर्चा, अभ्यास सुरू असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Mumbaiमुंबईlocalलोकल