डोंबिवली : वारंवार मागणी करूनही पत्नी घटस्फोट देत नसल्याने पतीने तिचा रस्त्यात विनयभंग केला. ही घटना सोमवारी दुपारी टिळकनगर परिसरात घडली. याप्रकरणी पतीला पोलिसांनी अटक केली आहे. पती-पत्नी तीन वर्षांपासून विभक्त राहत आहेत. पत्नी घरकाम करून उदरनिर्वाह करत आहे. सोमवारी दुपारी ती कामावरून घरी येताच पतीने तिला न्यायालयात जाण्याचा आग्रह धरला. तिने नकार देताच त्याने मारहाण केली. तसेच ठार मारण्याची धमकी दिली. मात्र, पत्नीचा विरोध कायम राहिल्याने पतीने तिचा रस्त्यात विनयभंग केला. याप्रकरणी पत्नीने टिळकनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी त्याला अटक केली.
विनयभंगप्रकरणी पती अटकेत
By admin | Updated: September 28, 2016 04:29 IST