शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

पालिकेवर मोर्चाचा बिल्डरांचा इशारा

By admin | Updated: March 28, 2016 02:28 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेने घनकचरा प्रकल्प उभारण्यात दिरंगाई केल्याने उच्च न्यायालयाकडून नव्या इमारतींच्या बांधकामास स्थगिती देऊन वर्ष उलटले तरीदेखील घनकचरा

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेने घनकचरा प्रकल्प उभारण्यात दिरंगाई केल्याने उच्च न्यायालयाकडून नव्या इमारतींच्या बांधकामास स्थगिती देऊन वर्ष उलटले तरीदेखील घनकचरा प्रकल्प उभारण्यात प्रगती होत नसल्याने बिल्डरांची संघटना महापालिकेवर मोर्चा काढणार आहे. बिल्डरांच्या संघटनेच्या बैठकीत मोर्चा काढण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे. २००० साली उच्च न्यायालयाने घनकचरा व्यवस्थापन नियमावलीनुसार शास्त्रोक्त पद्धतीने घनकचरा प्रकल्प उभारण्याचे आदेश दिले होते. महापालिकेने घनकचरा प्रकल्प उभारला नाही. तसेच शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कोणतेही पाऊल उचलले नाही. या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेवरील सुनावणीत उच्च न्यायालयाने कचरा प्रकल्प उभारा, तरच नव्या इमारतींच्या बांधकामांना परवानगी द्यावी, असे आदेश दिले. हा आदेश एप्रिल २०१५ मध्ये दिला. त्याला एक वर्ष पूर्ण होईल. महापालिकेकडून प्रकल्प उभारण्यासाठी कोणत्याही ठोस हालचाली झालेल्या नसल्याने यासंदर्भात ‘एमसीएचआय’ या बिल्डरांच्या संघटनेच्या खडकपाडा येथील कार्यालयात एक बैठक घेतली. या बैठकीस संघटनेचे पदाधिकारी प्रफुल्ल शहा, श्रीकांत शितोळे, दीपक मेहता, रवी पाटील आणि मिलिंद चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते. बांधकाम परवानगीस स्थगिती असल्याने बिल्डर बेजार झाले आहेत. त्याचबरोबर बांधकाम व्यवसायावर ज्यांचे पोट आहे, असे १२६ रोजगार करणारे मेटाकुटीला आले आहे. पालिकेस मिळणाऱ्या विकास शुल्काचे सुमारे १५० कोटी रुपये बुडाले आहेत. २०० कोटींचे प्रकल्प रखडल्याने या प्रकल्पातून होणारी एक हजार कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. बांधकाम स्थगिती उठवण्यासाठी महापालिकेने फेब्रुवारी महिन्यात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. मात्र, घनकचरा प्रकल्प उभारण्यात फारशी प्रगती झालेली नाही. (प्रतिनिधी)मोकळ्या जागेवरील कर (ओपन लॅण्ड टॅक्स) सगळ्यात जास्त या भागातील बिल्डरांकडून वसूल केला जातो. परिणामी, बिल्डरांची कोंडी झाली आहे. बिल्डर संघटनेच्या वतीने महापालिकेवर मोर्चा काढण्यात यावा, असा सूर सदस्यांनी लावला. बिल्डर सदस्यांच्या भावना लक्षात घेता लवकरच महापालिकेवर मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा संघटनेने दिला.