शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

‘मोडकसागर’ ९४ टक्के भरले, पाणीटंचाईचे संकट टळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 00:51 IST

आंध्रा व मध्य वैतरणा धरणात सर्वाधिक पाऊस पडला. मोडक सागर धरण ९४ टक्के, तर बारवी ७३ टक्के भरले आहे.

ठाणे : जिल्ह्यात सोमवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले. जिल्ह्यात सरासरी जेमतेम १६.७ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली असली तरी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस होत आहे. आंध्रा व मध्य वैतरणा धरणात सर्वाधिक पाऊस पडला. मोडक सागर धरण ९४ टक्के, तर बारवी ७३ टक्के भरले आहे.सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी होऊन पाणीकपात लागू करण्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून धरणांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे पाणीसाठा वाढला आहे. साहजिकच पाणीकपातीची चिंता आता दूर झाली आहे.गेल्या वर्षी आजच्या दिवशी ठाणे, मुंबईला पाणीपुरवठा करणारे बारवी, आंध्रा, मोडकसागर धरण १०० टक्के भरले होते. पण आता बारवीत ७२.८३ टक्के पाणी साठा झाला आहे. आज बारवी धरणाच्या परिसरात केवळ १० मि.मी. पाऊस पडला. मात्र, या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस पडला. यामध्ये खानिवरे ६० मि.मी., कान्होळ २७ मि.मी., पाटगाव आणि ठाकूरवाडीला आठ मि.मी. पाऊस झाला आहे. त्यामुळे पाणीसंकट टळले आहे.बारवीची पाणीपातळी ६९.१९ मीटर झाली असून हे धरण भरुन वाहण्याकरिता धरणात अजून ३.४१ मीटर पाणीसाठा आवश्यक आहे. भातसा धरणात ८२.७६ टक्के पाणीसाठा झाला आहे. सोमवारी धरणात २४ मि.मी. पाऊस पडला तर आंध्रा धरणात आज ५३ मि.मी. पाऊस झाला. आता या धरणात ५४.४२ टक्के पाणीसाठा आहे. मोडकसागरमध्ये ३५ मि.मी. पाऊस पडला. या धरणात ९४ टक्के साठा आहे. तानसात १६ मि.मी. पाऊस आज झाला असून ८२ टक्के साठा तयार झाला आहे.जिल्ह्यात सरासरी १६ मि.मी. पाऊस पडला. यापैकी ठाणे शहरात १६ मि.मी., कल्याण १७ मि.मी., मुरबाड १४ मि.मी., भिवंडी २० मि.मी., शहापूरला १९ मि.मी., उल्हासनगर ११ मि.मी. आणि अंबरनाथ १० मि.मी. पाऊस पडला आहे.