शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात पोलिसांचे मॉकड्रिल आणि नागरिकांची त्रेधातिरपिट.....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2021 00:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : दिल्लीत अलिकडेच इस्त्राईल देशाच्या दूतावास कार्यालयाजवळ झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातही बॉम्ब शोधक नाशक पथकासह ...

ठळक मुद्दे दोन कथित ‘दहशतवाद्या’ंचा हल्ला बॉम्ब शोधक नाशक पथकाचीही चाचपणी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: दिल्लीत अलिकडेच इस्त्राईल देशाच्या दूतावास कार्यालयाजवळ झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातही बॉम्ब शोधक नाशक पथकासह (बीडीडीएस) शीघ्र्र कृती दलाची कशी तयारी आहे? याची चाचपणी करण्यासाठी रविवारी रात्री ठाणे महापालिका मुख्यालयाजवळ मॉकड्रिल घेण्यात आले. यामध्ये अडीच तीन तासांच्या शोध मोहिमेनंतर दोन कथित ‘दहशतवाद्या’ना शोधण्यात शीघ्र कृती दलाला यश आले.दिल्लीतील या बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर ठाण्यात अशीच एखादी घटना घडलीच तर पोलिसांसह जिल्हा रुग्णालय, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन विभाग, शीघ्र कृती दल, बीडीडीएस या सर्वच यंत्रणांची कशी तयारी आहे, ते किती वेळात प्रतिसाद देतात. या प्रतिसादानंतर त्यांनी कशी तयारी केली आहे? आपल्या सर्व सामुग्रीची ते किती चपळाईने रात्रीच्या अंधारात हाताळणी करतात? हे सर्व या मॉकड्रिलमधून पाहिले जात होते, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली. पोलीस नियंत्रण कक्षातून शीघ्र कृती दलासह या सर्वच यंत्रणांना ठाणे महापालिकेच्या मुख्यालयात दोन दहशतवादी शिरल्याचा कॉल देण्यात आला होता. त्यानंतर बीडीडीएस पथकाचे पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड, शीघ्र कृती दलाचे प्रमुख श्रीकांत सोंडे यांनी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास आपल्या सात अधिकारी आणि ४५ जवानांच्या चमूसह ठाणे महापालिका मुख्यालयाचा ताबा घेतला. तब्बल दोन तास याठिकाणी अतिरेक्यांचे सर्चिंग आॅपरेशन चालले. तोपर्यंत रुग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या आणि पोलिसांची वाहने पाहून परिसरात घबराटीचे वातावरण पसरले होते. मोठया प्रयत्नानंतर दोन अतिरेक्यांना ९.३० वाजण्याच्या सुमाारास पकडल्यानंतर हे आॅपरेशन फत्ते झाल्याचे घोषित करण्यात आले. त्यानंतर हे केवळ एक मॉकड्रिल असल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आल्यामुळे सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी