शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
4
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
5
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
6
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
7
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
8
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
9
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
10
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
11
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
12
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
13
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
14
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
15
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
16
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
17
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
18
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
19
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
20
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला

रुग्णालय सुरक्षेसाठी मोबाइल व्हॅन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 00:55 IST

ठाणे जिल्हा शासकीय (सिव्हिल) रु ग्णालयातून बाळ चोरी असो या चिमुरडीवरील अत्याचार तसेच तरुणीचा विनयभंग या एका पाठोपाठ घडलेल्या तीन घटनांमुळे रुग्णालयाच्या सुरक्षेच्या अबु्रचे

ठाणे : ठाणे जिल्हा शासकीय (सिव्हिल) रु ग्णालयातून बाळ चोरी असो या चिमुरडीवरील अत्याचार तसेच तरुणीचा विनयभंग या एका पाठोपाठ घडलेल्या तीन घटनांमुळे रुग्णालयाच्या सुरक्षेच्या अबु्रचे धिंदवडे निघाल्यानंतर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची सुरक्षा लक्षात घेऊन ठाणे पोलिसांनी रुग्णालय आवारात एक पोलीस मोबाइल व्हॅन उभी केली आहे. तसेच रुग्णालयातील बंद असलेले पाच सीसीटीव्ही कॅमेरे पोलिसांच्या पत्रव्यवहारानंतर रुग्णालय प्रशासनाने तातडीने सुरू केले. तर,विनयभंग प्रकरणी पाहिजे असलेल्या त्या आरोपीच्या शोध घेण्यासाठी दोन पथके तैनात केली.पीडित तरुणीचे वडील हे क्षयरोग या आजाराने ग्रस्त असल्याने त्यांना ठाणे सिव्हील रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. त्याचसोबत पीडित तरुणीची आई दिवसभर तर ती रात्री थांबते. बुधवारी रात्री ती रुग्णालयाच्या मुख्य इमारतीमधील तळ मजल्यावरील एका बाकड्यावर झोपी गेली होती. त्यावेळी तिच्यासोबत अन्य रुग्णाचे नातेवाईकही झोपले होते. दरम्यान आरोपी ही तेथे झोपला होता. गुरूवारी पहाटे ३.३० वाजता तो तिच्याशी अश्लिल चाळे करू लागल्यावर तिने आरडाओरड करताच त्याने तेथून पळ काढला. याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात विनयभंगचा गुन्हा दाखल झाला आहे. तसेच तिने केलेल्या वर्णनानुसार,त्याचे तत्काळ रेखाचित्र रेखाटण्यात आले आहे.कर्मचाऱ्यांची चौकशीया घटनेनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम.व्ही.धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेनगर पोलिसांनी रुग्णालयातील कर्मचारी आणि पीडित तरुणीच्या नातेवाईकांची अशा २०-२५ जणांची चौकशी केली. या चौकशीत त्या आरोपीला कोणीही यापूर्वी कधीच पाहीले नाही. त्यातच सीसीटीव्ही बंद असल्याने त्याला शोधणे हे पोलिसांपुढे मोठे आव्हानच आहे.दोन पथके तैनातया गुन्ह्यात पाहिजे असलेल्या आरोपीचे पीडित तरुणीच्या माहितीनुसार रेखाचित्र काढले आहे.तसेच त्याला शोधण्यासाठी विशेष दोन पथके तैनात केली आहेत. ाटना घडली तेंव्हा घटनास्थळाचे आणि मुख्य गेटवरील सीसीटीव्ही कॅमेरा असे रुग्णालयाचा आवारातील एकूण पाच कॅमेरे बंद होते. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या पत्रव्यवहारानंतर, रुग्णालय प्रशासनाने आता ते कॅमेरे सुरू केले आहेत.