शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना दिली मोबाइल भात यंत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 22:34 IST

शेतकऱ्यांनी एकत्रित शेती करा; पालकमंत्री विष्णू सवरा यांनी दिला आधुनिक शेतीचा मंत्र, ७० यंत्रांचे वाटप

जव्हार : पालघर जिल्ह्यातील अनियमित पावसामुळे उत्पादन कमी होऊन होणाºया नुकसानीवर मात करण्यासाठी शासन विविध उपाययोजना राबवित आहे. शेतकºयांनी देखील आता पारंपरिक शेतीऐवजी एकत्र येऊन शेतीचा विकास साधणे ही काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री विष्णू सवरा यांनी केले. ते जव्हार येथे बोरलॉग इन्स्टिट्युट आॅफ साऊथ एशिया (बिसा) या संस्थेच्यावतीने सोमवारी जव्हारच्या राजीव गांधी स्टेडियम येथे झालेल्या कार्यक्र मात बोलत होते.राज्याचा आदिवासी विकास विभाग आणि बिसाच्यावतीने हवामान संपुरक आदिवासी खेडी विकास कार्यक्रम राबविला जात आहे. त्या अंतर्गत पालघर जिल्ह्यातील शेतकºयांसाठी ७० मोबाइल भात यंत्रांचे प्रातिनिधीक वाटप त्यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. खासदार राजेंद्र गावित, जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे, जव्हारचे आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अजित कुंभार, उप वनसंरक्षक अमित मिश्रा, बिसाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.अरूण जोशी आदी उपस्थित होते.हवामान बदलाचे मोठे दुष्परिणाम जिल्ह्याला सोसावा लागत असल्याने पारंपरिक शेतीऐवजी कृषी पूरक तंत्रज्ञान अवलंबण्याची आवश्यकता खासदार राजेंद्र गावित यांनी प्रतिपादित केली. बांधव परिस्थितीशी झगडणाºया शेतकºयाची मोबाइल भात यंत्रामुळे गावातच तांदूळ तयार करण्याची सोय होऊन त्याचा खर्च वाचणार असल्याचे ते म्हणाले.शेतकऱ्यांच्या कंपन्या उत्पादनांचे ब्रॅँडींगजिल्हाधिकारी डॉ.नारनवरे यांनी शेतकºयांचा विकास साधण्यासाठी जिल्ह्यात साडेचार हजार शेतकरी गट तयार केले असल्याचे सांगितले. याद्वारे शेतकºयांच्या कंपन्या तयार करण्यात येणार असून विविध उत्पादनांचे ब्रँडींग केले जाणार आहे. उत्पादनांना पॅकेजिंग, ब्रँडींग आणि मार्केटिंगमुळे मागणी वाढते. जिल्ह्यात आॅरगॅनिक राईस मोठ्या प्रमाणावर आहे, त्याला योग्य भाव मिळवून देण्यासाठी या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज त्यांनी प्रतिपादित केली. क्लस्टरच्या माध्यमातून मागील २-३ महिन्यात काही गावांमध्ये अडीच लाख शेवग्याची रोपे विनामूल्य वाटण्यात आली असून त्यांना मोठी मागणी येण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Farmerशेतकरीpalgharपालघर