शहरं
Join us  
Trending Stories
1
Vladimir Putin India Visit : नाकावर टिच्चून! "भारताला इंधन पुरवठा सुरूच राहणार", पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं; PM मोदींचीही रशियासाठी मोठी घोषणा
2
रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पीएम मोदींसोबतच्या बैठकीत पुतिन यांचे मोठे विधान, म्हणाले...
3
अशीही आईची माया! जिच्या मुलीचा जीव घेतला, तीच आता 'सायको पूनम'च्या मुलाचा सांभाळ करणार
4
"मला खरंच वाटत नव्हतं.."; लग्न लांबणीवर पडल्यानंतर पहिल्यांदा स्मृती मंधानाची इन्स्टा पोस्ट
5
Flight Fare Hike: मुंबई-दिल्ली विमानाचे तिकीट झाले ५०-६० हजारांना; इंडिगोची विमाने रद्द, दुसऱ्या कंपन्यांनी लुटायला सुरुवात केली...
6
“महायुती सरकारने एका वर्षाच्या कामाची श्वेतपत्रिका काढावी”; विजय वडेट्टीवार यांची मागणी
7
आता 'झीरो बॅलन्स' खात्यातही मिळणार ATM, चेकबुकसह अनलिमिटेड सुविधा; RBI चे नवे नियम जाहीर
8
१०० वर्षांनी २ शत्रू ग्रहांचा समसप्तक योग: ७ राशींना लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा; मनासारखे घडेल!
9
'धुरंधर'च्या क्लायमॅक्सची चर्चा, आता दुसरा भागही येणार; रिलीज डेटची अधिकृत घोषणा
10
संकटादरम्यान IndiGo नं ग्राहकांची मागितली माफी; रिफंड आणि फ्लाइट रीशेड्युल वर केली मोठी घोषणा
11
लिओनेल मेस्सी फुटबॉल विश्वचषकापूर्वी निवृत्त होणार? दिग्गज फुटबॉलरच्या 'या' विधानाने खळबळ
12
इंडिगोला मोठा दिलासा! डीजीसीएने क्रू विश्रांतीचा नियम मागे घेतला, तरीही उड्डाणे सुरळीत होण्यासाठी काही दिवस लागणार
13
VIDEO : पांड्याचा स्वॅगच वेगळा! ज्यानं विकेट घेतली त्याच्या गळ्यात जाऊन पडला अन्...
14
नगरपालिकांची मतमोजणी २१ डिसेंबरलाच; सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवला, पण...
15
'मिर्झापूर'मध्ये का काम केलंस? 'ॲनिमल'वर टीका करणाऱ्या अभिनेत्रीला नेटकऱ्यांचा थेट सवाल
16
थरार! गाझामध्ये हमासचा कर्दनकाळ ठरलेल्या यासर अबू शबाबला घरातच संपवले! भांडणं ठरलं मृत्यूचं कारण
17
IndiGo Flight Cancellations: लहान मुले-वृद्धांनी बेंचवर झोपून रात्र काढली; इंडिगो संकटामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल;..!
18
जो रुट सुसाट! सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड धोक्यात! पण इंग्लंड बॅटरला खरंच ते शक्य होईल का?
19
१ लाखापर्यंतच्या रकमेसाठी समान व्याजदर, RBIकडून सर्व बँकांसाठी नवे नियम; होणार फायदा
20
एअरटेलने स्वस्तातले ३० दिवसांचे दोन प्लॅन बंद केले; आता जास्त पैसे मोजल्याशिवाय पर्याय नाही
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइल चोरणाऱ्या दुकलीला केली अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 01:03 IST

ठाण्यातील घटना : न्यायालयाने ठोठावली दोन दिवसांची पोलीस कोठडी

ठाणे : मोटारसायकलवरून येऊन वागळे इस्टेट, श्रीनगर आणि वर्तकनगर परिसरातील पादचाऱ्यांचे मोबाइल हिसकावून पळ काढणाºया अविराज यादव (२०, श्रीनगर, वागळे इस्टेट, ठाणे) आणि सुमित ऊर्फ गोरू भुंबक (१९, रा. वाल्मीकीपाडा, वागळे इस्टेट, ठाणे) या दोघांना वागळे इस्टेट पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. त्यांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. त्यांच्याकडून दोन लाख ५४ हजारांचे सात मोबाइल हस्तगत करण्यात आले आहेत.

मुंबई-अहमदाबाद पूर्व दु्रतगती महामार्गालगतच्या सेवारस्त्यावरून शिवबदन विश्वकर्मा (३४, रा. सावरकरनगर, ठाणे) हे २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास पायी जात होते. त्याचवेळी एका स्कूटीवरून आलेल्या दोघा भामट्यांनी त्यांच्या हातातील सात हजारांचा मोबाइल हिसकावून पळ काढला. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. वागळे इस्टेट, श्रीनगर आणि वर्तकनगर या परिसरांमध्ये मोटारसायकलवरून येत पायी जाणाºया नागरिकांचे मोबाइल जबरीने चोरून त्यांची विक्री करून मौजमजा करणाºया दुकलीची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अफजल पठाण यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे २५ फेब्रुवारी रोजी पोलीस उपनिरीक्षक विनोद लबडे यांचे पथक तपास करत असताना दोघेजण एका स्कूटीवरून वागळे इस्टेट, बीअर कंपनीजवळून संशयास्पदरीत्या जाताना आढळले.

पोलिसांनी त्यांना बोलते केल्यानंतर अविराज आणि सुमित अशी त्यांची नावे सांगितली. त्यांनी सेवारस्त्यावरील जबरी चोरीची कबुलीही दिली. जबरी चोरीसाठी वापरलेली स्कूटीही पोलिसांनी त्यांच्याकडून जप्त केली आहे.वागळे इस्टेट, श्रीनगर आणि वर्तकनगर या भागांतून अशा प्रकारचे १२ मोबाइल जबरीने चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून वेगवेगळ्या कंपन्यांचे दोन लाख ५४ हजारांचे सात मोबाइल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यांनी आणखीही गुन्हे केल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून त्यांच्या साथीदारांचाही शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.