शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

विसर्जनावेळी गर्दी टाळण्यासाठी मोबाइल अ‍ॅपचा होणार वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2020 01:26 IST

पाच जणांच्या उपस्थितीत हे विसर्जन पार पडणार असल्याची माहिती महापौर प्रतिभा पाटील यांनी दिली.

भिवंडी : गणेशमूर्ती विसर्जनावेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी शासनाने लागू केलेल्या अटींनुसार भिवंडी महापालिकेने मोबाइल अ‍ॅप तयार केले आहे. या मोबाइल अ‍ॅपवरून घाटावर विसर्जनाची वेळ गणेशभक्तांना मिळणार आहे. त्यानुसार पाच जणांच्या उपस्थितीत हे विसर्जन पार पडणार असल्याची माहिती महापौर प्रतिभा पाटील यांनी दिली.गणेशोत्सवाबाबत भिवंडी पोलीस आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक सोमवारी पार पडली. या वेळी महापौर पाटील आणि आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी नागरिकांना गर्दी टाळण्याचे आवाहन केले. या बैठकीस पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, स्थायी समिती सभापती हलीम अन्सारी, विरोधी पक्षनेते यशवंत टावरे, सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष मदन भोई आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.भिवंडी शहरातील घरगुती गणेशमूर्तींची उंची दोन फुटांपर्यंत तर सार्वजनिक गणेशोत्सवासाठी चार फूट उंच मूर्तीची मर्यादा निश्चित केली आहे. तर गणेश आगमन व विसर्जन मिरवणूक गणेशभक्तांना काढता येणार नाही. तसेच सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडपांमध्ये थर्मल स्कॅनर आणि पल्स आॅक्सिमीटरद्वारे तपासणी बंधनकारक करण्यात आली आहे. तसेच प्रत्येकाची नोंदही ठेवण्याची अट मंडळांना घातली असून, मास्क लावणे बंधनकारक असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. भिवंडी महापालिकेने गणेशोत्सवासाठी तयार केलेल्या नियमावलीनुसार गणेश आगमन आणि विसर्जनावेळी पाच व्यक्तींनाच परवानगी दिली आहे. गणपतीची सजावट पर्यावरणपूरक आणि कमीतकमी असावी.>निर्माल्य महापालिकेकडे द्या!मोठ्या गृहसंकुलांतील गणेशमूर्तींचे विसर्जन मोठ्या टाकीमध्ये करण्याची दक्षता घेण्याबरोबरच निर्माल्य स्वतंत्र जमा करून ते विल्हेवाटीसाठी महापालिकेकडे सुपूर्द करावे, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे. शाडूच्या गणेशमूर्तीची पूजा करून तिचे घरीच बादलीमध्ये विसर्जन करावे. तर पीओपीच्या मूर्तीच्या विसर्जनासाठी अमोनिया बायकार्बोनेटचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सार्वजनिक गणेश मंडळांनी गणपतीची प्रतिष्ठापना टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गणेश दर्शनासाठी केबल नेटवर्क, आॅनलाइन सुविधा अथवा फेसबुक लाइव्हवरून व्यवस्था करावी. विसर्जनस्थळी नागरिकांना कमीतकमी वेळ थांबता यावे यासाठी भक्तांनी घरीच आरती करावी. तसेच, शक्यतो घराच्या आवारात, इमारतीच्या परिसरात विसर्जन करावे. विसर्जनासाठी येताना मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत.अन्नदान, महाप्रसादाच्या कार्यक्रमाला मनाई केली आहे. मंडपाची उंची १२ फुटांपेक्षा जास्त असू नये; तसेच आरोग्यविषयक आणि सामाजिक संदेश देणाºया जाहिराती प्रदर्शित कराव्यात, असे आयुक्त डॉ. आशिया यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Ganesh Festival Ritualsगणेशोत्सव विधीGanpati Festivalगणेशोत्सव