शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

टोलनाक्यावर मनसेची जनजागृती, पोलिसांनी घेतले ताब्यात

By अजित मांडके | Updated: October 9, 2023 15:39 IST

मागील काही दिवसापासून ठाण्यासह राज्यात टोलदरवाढीचा मुद्दा चांगलाच गाजत आहे.

ठाणे : टोलदरवाढी विरोधात मनसेने पुकारलेल्या उषोणानंतर चारचाकी वाहनांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच टोल नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आनंद नगर टोलनाक्यावर जनजागृती केली. यावेळी येणाऱ्या प्रत्येक तीन, चारचाकी वाहनांना उपमुख्यमंत्र्यांचा व्हिडीओ दाखवून टोल भरु नका असे आवाहन केले जात होते. परंतु याचवेळेस पोलिसांनी जनजागृती करणाऱ्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. आमची चूक काय असा सवाल करीत मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी पोलिसांच्या या भुमिकेला विरोधसुध्दा केला. मात्र तरीसुध्दा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

मागील काही दिवसापासून ठाण्यासह राज्यात टोलदरवाढीचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. सुरवातीला टोलनाक्यावर आंदोलन त्यानंतर शहरातील चौकाचौकात आंदोलन, नंतर गांधीगिरीच्या मार्गाने आंदोलन आणि चार दिवसांचे उपोषण अशा गांधीगिरी मार्गाने मनसेने ठाण्यात टोलदरवाढीविरोधात आंदोलन उभे केले. रविवारी राज ठाकरे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली आणि हे आंदोलन मागे घेण्यास सांगितले. त्यानंतर मुंबईत सोमवारी ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत, दुचाकी, तीन चाकी आणि चारचाकी वाहनांना टोलनमुक्ती द्या अन्यथा टोल नाके जाळू असा इशारा दिला आहे. तिकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चार चाकी वाहनांना केव्हांच टोल माफी झाल्याचे सांगितले. उपमुख्यमंत्र्यांचा हा व्हिडीओ व्हायरल होत नाही तोच, मनसेच्या ठाण्यातील पदाधिकाऱ्यांनी आनंद नगर टोलनाका गाठला.

यावेळी अविनाश जाधव यांच्यासह शहर अध्यक्ष रवि मोरे, उपशहर अध्यक्ष पुष्कराज विचारे आदींसह इतर पदाधिकाऱ्यांनी येथून जाणाऱ्या वाहन चांलकांना उपमुख्यमंत्र्यांचा व्हिडीओ दाखवून चारचाकी वाहनांना टोलमाफी झाली असल्याने टोल भरू नका अशी विनंती करण्यास सुरुवात केली. परंतु त्याला नवघर पोलिसांनी अटकाव केला. परंतु आम्ही कोणतेही आंदोलन करीत नसून केवळ जनजागृती करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगत आम्ही अटक होणार नसल्याची भुमिका जाधव यांनी घेतली. परंतु तरीदेखील पोलिसांनी त्यांना अटकाव केला. उपमुख्यमंत्र्यांनी सांगूनही टोलनाक्यावर पैसे घेतले जात आहेत, त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली. टोल घेतला जाऊ नये असे असतांना जबरदस्तीने टोलवसुली केली जात असल्याचे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. परंतु तरीदेखील पोलिसांनी या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले.

टॅग्स :MNSमनसेtollplazaटोलनाकाAvinash Jadhavअविनाश जाधव