शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

मनसे ठाणे, पालघर लोकसभा लढणार; राज ठाकरे यांनी ठाण्यात घेतली पदाधिकाऱ्यांची बैठक

By अजित मांडके | Updated: August 17, 2023 17:24 IST

"गुरुवारी शासकीय विश्रामगृहात झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत या संदर्भात चर्चा झाली..."

ठाणे : आगामी लोकसभा निवडणुक लढण्यासाठी मनसे देखील सज्ज झाली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्यातील तीन आणि पालघरची एक जागा अशा चार जागा मनसे लढणार असल्याची माहिती मनसेचे ठाणे - पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिली. गुरुवारी शासकीय विश्रामगृहात झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत या संदर्भात चर्चा झाली असून उमेदवार देखील निश्चित झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.

मागील काही महिन्यापासून मनसेने ठाण्याकडे आपले लक्ष केंद्रीत केले आहे. त्यातही मुख्यमंत्र्यांच्या ठाणे शहरासह जिल्ह्यात आधीच भाजपने डोके दुखी वाढविली आहे. त्यात काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठाण्यात हजेरी लावून शिंदे गटाला आव्हान दिल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यानंतर आता मनसे थेट लोकसभा निवडणुक लढण्याचे जाहीर करुन शिंदे गटाला मोठे आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आता सुरु झाली आहे. त्यात गुरुवारी झालेल्या बैठकीत त्या दृष्टीने मोर्चे बांधणी कशी करायची याची चर्चा झाली असून  पुढे जाऊन कार्यकर्त्यांनी काय कराव, पदाधिकाऱ्यांनी काय करावे या संदर्भात देखील चर्चा झाल्याची माहिती जाधव यांनी दिली. तसेच पुढील सहा महिन्यात महाराष्टÑ सैनिक घराघरात पोहचणार असल्याचेही सांगण्यात आले.  

आताच्या घडीला भाजपमध्ये आलेले आमदार, खासदार मोजा ते कुठुन आलेले आहेत, राष्टÑवादी, कॉंग्रेस, मनसे, शिवसेनेतून आलेल्या लोकांची फळी भाजपने बांधलेली आहे.  त्यामुळे बाहेरून आलेल्या आमदारांना घेऊन संघटना बांधलेल्यांनी आम्हाला शिकवू नये असा इशाराही जाधव यांनी दिला. आमचा एक आमदार आहे तो देखील आमचा हक्काचा आहे. येणाऱ्या चार दिवसात मनसेत मोठा प्रवेश होणार असल्याचा दावाही त्यांनी केला.

दरम्यान या बैठकीत कळवा रुग्णालया संदर्भात राज ठाकरे यांनी माहिती घेतली असून बळी कशामुळे गेले आहेत, त्याची माहिती घेतली पाहिजे अशी सुचना त्यांनी केली.  तसेच ठाणे, भिवंडी, कल्याण सारख्या अनेक शहरात खड्डे पडले असून प्रशासनाला जागे करण्यासाठी लोकांना सोबत घेऊन आंदोलन करण्याच्या सुचनाही राज यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले.

कळवा रुग्णालयात जाणे टाळलेकळवा रुग्णालयात मृत्युचे तांडव झाल्यानंतर गुरुवारी राज ठाकरे देखील त्याठिकाणी जातील अशी शक्यता होती. किंबहुना ते त्याच मार्गे पुढे दौऱ्यासाठी गेले. मात्र त्यांनी कळवा रुग्णालयात जाणे टाळले. केवळ तेथील रुग्णांना त्रास होऊ नये म्हणून त्याठिकाणी जाणे टाळल्याचा दावा जाधव यांनी केला. तर आयुक्तांशी चर्चा करुन जे जे रुग्णालयमध्ये काय काय बदल करण्यात आले आहेत, त्या धर्तीवर कळवा रुग्णालयात काय करता येईल का? याची चर्चा करावी अशा सुचना दिल्याचे त्यांनी सांगितले.

मनसे नेते राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची भेट घेण्यापूर्वी त्यांच्या वर्ग मैत्रीण असलेल्या अशिलता राजे यांची त्यांची घरी जाऊन भेट घेतली. दादर येथील बालमोहन शाळेत ते एकत्र होते. 

टॅग्स :Maharashtra Navnirman Senaमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाRaj Thackerayराज ठाकरेlok sabhaलोकसभाPoliticsराजकारण