शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका क्षेत्रातील अनाधिकृत शाळांवर कारवाईची मनसे विद्यार्थी सेनेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 16:23 IST

शहरातील अनाधिकृत शाळा बंद करण्यासाठी गुरुवारी मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या वतीने शिक्षण विभाग कार्यालयासमोर आंदोलन केले. या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना इतर शाळांमध्ये स्थलांतरीत करण्याची मागणीही त्यांनी केली.

ठळक मुद्देअनाधिकृत शाळांना १ लाखांचा दंड आकाराफौजदारी कारवाईची मागणी

ठाणे - ठाणे महापालिका क्षेत्रातील अनाधिकृत शाळांवर दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी महाराष्ट्र नविनर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने ठाणे महापालिका शिक्षण विभाग कार्यालयाबाहेर गुरुवारी निदर्शने करण्यात आली.                     ठाणे महापालिका शिक्षण विभागाने ठाणे महापालिका क्षेत्रातील वागळे इस्टेट, राबोडी, कळवा, मुंब्रा आणि दिवा या भागातील ६४ शाळा अनाधिकृत म्हणून घोषित केल्या आहेत. या शाळा बंद करण्याचे आदेश लोकायुक्तांनी ठाणे महापालिका शिक्षण मंडळाला दिले असताना देखील आजपर्यंत एकाही शाळेवर महापालिकेने कारवाई केलेली नाही. त्यामुळे या शाळांमध्ये शिकणाऱ्या सुमारे १० हजार विद्यार्थी मूलभूत सोयींपासून वंचित राहत असल्याने मुलांचे नुकसान होत आहे. त्यामुळे या अनाधिकृत शाळांवर कारवाई करून यामध्ये शिक्षण घेणाºया मुलांना जवळच्या अधिकृत शाळांमध्ये सामावून घेण्यात यावे या मागणीसाठी मनसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव व शहराध्यक्ष रविंद्र मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नविनर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी शहराध्यक्ष अरुण घोसाळकर यांच्या नेतृत्वाखाली ठाणे महापालिका शिक्षण विभाग कार्यालयाबाहेर अनाधिकृत शाळांची नावे असलेले फलक गळ्यात अडकवून निदर्शने केली व शिक्षण मंडळ उपायुक्त मनीष जोशी यांना निवेदन दिले.शिक्षण हक्क कायद्यानुसार अशाप्रकारच्या अनाधिकृत शाळांना १ लाख रु पये दंड तसेच दंड घेतल्यानंतर शाळा सुरु राहिल्यास प्रतिदिन १० हजार दंड व नंतर फौजदारी कारवाई अपेक्षित असताना देखील कोणतीही कारवाई शिक्षण मंडळ करत नसल्याने यामध्ये शिकणाºया मुलांचे नुकसान होत आहे. त्यामुळे सदरचे आंदोलन करण्यात आल्याचे घोसाळकर यांनी सांगितले. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाMNSमनसे