शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

लाखाच्या हमीलाही मनसेचा नकार, राज ठाकरे यांच्या निर्णयाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 03:00 IST

मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना नौपाडा पोलिसांनी बजावलेल्या जामीन नोटिसीतील हमीची रक्कम ठाणे पोलिसांनीही पुन्हा एकदा घटवून एक कोटीवरून आता एक लाखांवर आणली आहे.

ठाणे : मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना नौपाडा पोलिसांनी बजावलेल्या जामीन नोटिसीतील हमीची रक्कम ठाणे पोलिसांनीही पुन्हा एकदा घटवून एक कोटीवरून आता एक लाखांवर आणली आहे. परंतु, ही एक लाखाची रक्कमही भरणार नसल्याचा पवित्रा आता जाधव यांनी घेतला आहे. याबाबत, पक्षप्रमुख राज ठाकरे जो आदेश देतील, त्याचे आम्ही पालन करू, असे त्यांनी सांगितले.फेरीवाल्यांविरुद्ध आक्रमक आंदोलन करण्याच्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता असल्याने आगामी तीन वर्षांच्या कालावधीसाठी चांगल्या वर्तणुकीच्या हमीकरिता जाधव यांच्याकडे एक कोटीच्या जामिनाची मागणी करणारी नोटीस नौपाडा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त तथा विशेष कार्यकारी दंडाधिकारी अभय सायगावकर यांनी बजावली होती. ती आल्यावर मनसेतून नाराजीचा सूर उमटू लागला. त्यानंतर, याबाबत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी ठाणे पोलीस आयुक्तांची भेट घेतल्यानंतर झालेल्या चर्चेत हमी रक्कम एक कोटीवरून पाच लाख करण्यात आली. परंतु, या हमी रकमेविरोधात हायकोर्टात आव्हान देणार असल्याचे नांदगावकर यांनी सांगितले होते. एक कोटीची हमी रक्कम रेल्वे प्रशासनाने भरायला हवी. ती आमच्यावर का टाकता, असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता. त्यानंतर, पोलिसांनी जाधव यांना पुन्हा एकदा नोटीस बजावली असून तीत हमी रक्कम कमी करून एक लाखांवर आणली आहे.याबाबत, जाधव यांना विचारले असता ही रक्कम आम्ही भरणार नसून याबाबत राज ठाकरे यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.>कोर्टात गेल्याचा दावासराईत गुन्हेगारालाही १५ हजारांपर्यंत जामीन देण्याची पद्धत असताना ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी बॉण्डबाबत घेतलेला निर्णय त्यांच्या पुढील वाटचालीसाठी बाधक ठरेल. याविरोधात कोर्टात गेल्याचे मनसे नेते अभिजित पानसे यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेMNSमनसे