शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

Raj Thackeray: “शरद पवार नास्तिक, देव मानत नाहीत, देवळात हात जोडतानाचा फोटो सापडणार नाही”: राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 21:18 IST

Raj Thackeray: राज ठाकरे म्हणाले, शरद पवार कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेताना दिसणार नाहीत. कारण...

ठाणे: राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) आपल्या भाषणात नेहमी शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र असल्याचे सांगत असतात. ते कुणीही नाकारू शकत नाही. परंतु, शरद पवार कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेताना दिसत नाही. शाहू-फुले-आंबेडकर यांच्या आधी हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे. शरद पवार नास्तिक, देव मानत नाहीत, देवळात हात जोडतानाचा फोटो सापडणार नाही, या शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. 

ठाण्यात राज ठाकरे यांची उत्तरसभा पार पडली. या सभेत राज ठाकरे यांनी टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले. मशिदींवरील भोंगे खाली उतरवावेच लागतील. तो मुद्दा सोडणार नाही. सरकारने काय हवे ते करावे, असे आव्हानच राज ठाकरे यांनी यावेळी दिले. तसेच ३ मेपर्यंत भोंगे उतरवण्याचा अल्टिमेटम सरकारला दिला असून, अन्यथा मशिदींसमोर हनुमान चालिसा लावणार म्हणजे लावणार, असा एल्गार राज ठाकरे यांनी यावेळी केला. आत्ता हनुमान चालिसा सांगतोय, माझ्या भात्यातील पुढचा बाण काढायला लावू नका, असा इशाराही राज ठाकरे यांनी यावेळी दिला. 

शरद पवारांवर साधला जोरदार निशाणा

शरद पवार यांच्याकडे घेण्यासारखे अनेक गुण आहेत. मात्र, स्वार्थी राजकारणासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर जातीयद्वेष महाराष्ट्रात पसरला, असा पुनरुच्चार राज ठाकरे यांनी केला. प्रत्येक जातीचा माणूस शिवरायांसाठी, स्वराज्यासाठी लढला. शिवरायांचा इतिहास घराघरात पोहोचणे महत्त्वाचे आहे. मात्र, तो कुणी लिहिला, यावरून राजकारण केले गेले. जाती-पातीत महाराष्ट्र अडकला गेला. महाराष्ट्राला कुणीही हरवू शकत नाही, मात्र राज्यातील जातीचे राजकारणच आपल्याला हरवेल, अशी खंत राज ठाकरे यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतरच अनेक संघटना स्थापन झाल्या.  महाराष्ट्रात जाती होत्याच पण राष्ट्रवादीच्या जन्मानंतर जातीयवाद महाराष्ट्रात आला. जातीयद्वेष पसरला, असा मोठा आरोप राज ठाकरे यांनी केला. 

शरद पवार कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेताना दिसणार नाहीत

शरद पवार कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेताना दिसणार नाहीत. छत्रपतींचे नाव घेतल्यावर मुस्लीम मते जातील ही शरद पवारांना भीती आहे, असा दावा करताना अफझल खान वीणा वर्ल्डचे तिकीट काढून महाराष्ट्र दर्शनाला आला होता का, अशी खोचक विचारणा राज ठाकरे यांनी केली. शरद पवारांनी आपल्या पद्धतीने राजकारण केले. बाबासाहेब पुरंदरेंमुळे घराघरात शिवाजी महाराज पोहोचले हे कुणीही अमान्य करणार नाही. शिवाजी महाराजांवर अनेकांनी लिहिले आहे, असेही राज ठाकरे यांनी नमूद केले.  

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेSharad Pawarशरद पवारthaneठाणेPoliticsराजकारण