शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
4
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
5
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
6
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
7
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
8
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
9
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
10
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
11
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
12
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
13
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
14
Navi Mumbai: तीन मित्रांच्या जीवावर बेतली पावसाळी सहल 
15
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
16
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
17
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
18
IPO: 'स्वप्न विकणारे' आयपीओ ठरले फसवे, रिटर्न्समध्ये गुंतवणूकदारांचा अपेक्षाभंग !
19
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
20
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली

टोल दरवाढीच्या विरोधात मनसेचे ठाण्यात चौक आंदोलन

By जितेंद्र कालेकर | Updated: October 1, 2023 21:00 IST

ठाण्यातील विविध भागात मनसे पदाधिकारी करणार टोल विषयी लोकांमध्ये जनजागृती.

जितेंद्र कालेकर, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: ठाण्याच्या सीमेवरील मुलुंड टोल नाक्यावर महाराष्ट्र नवनिमार्ण सेनेचे नेते अविनाश जाधव आणि शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी टोल दरवाढीच्या विरोधात शनिवारी साखळी आंदोलन करून या टोल वाढीचा निषेध नोंदविला. तर रविवारी आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्या अंतर्गत ठाण्यातील महत्त्वाच्या चौकात फलकांद्वारे जनजागृती आंदोलन केले.

राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) सध्या स्थितीत रस्त्याची देखभाल करीत नसून रस्ते बृहन्मुंबई महानगरपालिकेला हस्तांतरण केले आहेत. एकूण ५५ पूलांपैकी फक्त १३ पूलांची एमएसआरडीसी प्राधिकरणाच्या वतीने देखभाल केली जाते. त्यामुळे प्राधिकरण जर देखभाल करीत नसेल तर त्यांच्यामार्फत टोल वसुल करणे चुकीचे आहे. या विरोधात मनसेने आंदोलनाची भूमिका घेतली असून रविवारी ठाण्यातील चौका चौकात आंदोलन करीत टोल दरवाढीला तीव्र विरोध करत मनसे पदाधिकारी यांनी घोषणा देत आपला विरोध दर्शवला.या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही ठाणेकर नागरिकांना येत्या ५ ऑक्टोबर रोजी मनसे नेते अविनाश जाधव यांच्या वतीने करण्यात येणाऱ्या टोल दरवाढीच्या उपोषणात सहभागी होण्याचे आवाहन करीत असल्याचे स्वप्नील महिंद्रकर यांनी सांगितले.

टॅग्स :tollplazaटोलनाकाthaneठाणे