शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

फेरीवाला परवान्यासाठी अधिवास प्रमाणपत्राची अट रद्द करू नये, अन्यथा न्यायालयात दाद मागणार असल्याचा मनसेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 15:40 IST

फेरीवाला परवान्यासाठी अधिवास प्रमाणपत्राची अट रद्द करू नये अशी मागणी मनसेने केली आहे. 

ठळक मुद्देफेरीवाला परवान्यासाठी अधिवास प्रमाणपत्राची अट रद्द करू नये - मनसेन्यायालयात दाद मागणार असल्याचा मनसेचा इशाराअधिवास दाखला बंधनकारक करावा - मनसे

ठाणेठाणे महानगरपालिकेच्या वतीने ठाणे शहरात दिल्या जाणाऱ्या फेरीवाला परवान्यासाठी अधिवास प्रमाणपत्राची अट रद्द करू नये अशी मागणी मनसेच्या वतीने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप पाचंगे यांनी ठाणे महापालिकेच्या आयुक्तांना निवेदन देऊन केली आहे.

ठाणे शहरात फेरीवाला धोरण फ्रत्यक्षात उतरविण्यासाठी प्रयत्नशील असल्याबद्दल ठाणेकरांच्या वतीने आयुक्तांचे आभार मानून संदीप पाचंगे निवेदनात म्हणतात की, उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अधिवास दाखला बंधनकारक आहे परंतु आपण त्यावर तोडगा म्हणून आधारकार्ड, वीजबील, घरभाडे करारनामा इत्यादी वास्तव्याचे पुरावे म्हणून ग्राह्य धरुन फेरीवाला परवाना देण्याचे आपण आदेश दिले आहेत. आधारकार्ड पुरावा म्हणून वापरण्यास बंधनकारक नसल्याचे उच्च न्यायालयाने देखील सांगितले आहे. ठाणे शहरात फेरीवाला म्हणून व्यवसाय करण्याचा पहिला अधिकार ठाण्यात वर्षानुवर्षे राहणाऱ्या ठाणेकरांचा आहे. नुकतेच रेल्वेवर परप्रांतीयांच्यामुळे अतिरिक्त बोजा वाढला आहे हे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. आधीच शहरातील वाढणारी गर्दी डोकेदुखी ठरत असताना आपण न्यायालयाच्या निर्णयाचा अवलंब न करून परप्रांतीयांना एक फ्रकारे आमंत्रण देत आहात असे संदीप पाचंगे यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनानंतर मोकळा श्वास घेणाऱ्या ठाण्यातील सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणावर आपले कर्मचारी हप्ता घेऊन फेरीवाल्यांना व्यवसाय करण्याची परवानगी देतात. आपण दिलेल्या सवलतीच्या गैरवापर घेऊन बरेचसे परप्रांतीय फेरीवाले परवानाधारक होतील व भविष्यात स्वत:चा हक्क सांगतील. आपण बदली झाल्यावर निघून जाल परंतु आपला हा निर्णय ठाणेकरांचे कायमस्वरुपीचे नुकसान करणारा ठरेल असे संदीप पाचंगे यांनी म्हटले आहे. तरी ठाणे महानगरपालिकेने उच्च न्यायालयाच्या अटी, शर्ती मध्ये कोणताही बदल न करता अधिवास दाखला बंधनकारक करावा व ज्यांना हा दाखला मिळवायचा आहे त्यांच्यासाठी एकदिवसीय शिबीर आयोजित करावे आणि जर आपण कोर्टाच्या निर्णयाचा अवमान केलात तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याविरोधात न्यायालयात दाद मागेल असा इशारा मनविसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप पाचंगे यांनी दिला आहे.

टॅग्स :thaneठाणेMNSमनसेhawkersफेरीवाले