शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मनसे विद्यार्थी सेनेच्या निवेदनाची पालिकेकडून दखल, एस. जी. इंग्रजी शाळेला बजावली नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 16:37 IST

मनसे विद्यार्थी सेनेच्या निवेदनाची पालिकेकडून दखल घेतली आहे. 

ठळक मुद्देमनसे विद्यार्थी सेनेच्या निवेदनाची पालिकेकडून दखलएस. जी. इंग्रजी शाळेला बजावली नोटीसअन्यथा या शाळेबाबत शासनस्तरावर निर्णय घेणार - ऊर्मिला पारधे

ठाणे : दुरावस्थेच्या विळख्यात अडकलेल्या घोडबंदर रोड येथील एस.जी. इंग्रजी शाळेबाबत मनसे विद्यार्थी सेनेने दिलेल्या निवेदनाची ठाणे महापालिकेने दखल घेतली आहे. या शाळेला पालिकेने नोटीस बजावली असून येत्या आठ दिवसांत शाळेकडून उत्तर न आल्यास शाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला जाईल असे पालिकेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच, शाळेची अत्यंत दुरावस्था असल्याचा दुजोराही त्यांनी दिला.      शाळेतील पत्र्याच्या भिंती, दरवाजे नसलेले शौचालय, तोडकी-मोडकी बैठक व्यवस्था अशी  एस.जी. इंग्रजी शाळेची अवस्था मनसे विद्यार्थी सेनेने ठाणे महापालिकेचे आणि जिल्हा परिषदेचे शिक्षण विभागाच्या निदर्शनास आणली. अशा सर्व गोष्टींकडे डोळेझाक करु न प्रशासन येथे शिक्षण घेणाºया विद्यार्थांचे भवितव्य धोक्यात आणत आहेत. अशा खाजगी शाळांना मान्यता कशी मिळते असा सवाल मनविसेचे ठाणे शहर अध्यक्ष किरण पाटील यांनी संबंधित अधिकाºयांकडे उपस्थित केला. या शाळेत शिकणाºया विद्यार्थ्यांच्या अनेक पालकांनी पाटील यांच्याकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. या तक्रारींवरुन त्यांनी या शाळेने विद्यार्थ्यांना शिक्षण्यायोग्य व्यवस्था करावी अन्यथा या शाळेची मान्यता रद्द करावी अशी मागणी पालिका आणि जिल्हा परिषद प्रशासनाकडे केली. तसेच, शाळेलाही आंदोलनाचा इशारा दिला. मनसे विद्यार्थी सेनेचे निवेदन प्राप्त झाल्यावर पालिकेच्या शिक्षण विभागाने या शाळेला भेट दिली. त्यावेळी ही शाळा बंद होती. त्यामुळे पालिकेच्या शिक्षणाधिकारी ऊर्मिला पारधे यांनी त्यांना नोटीस बजावली असून आठ दिवसांची मुदत दिली आहे. अन्यथा या शाळेबाबत शासनस्तरावर निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. -----------------------------------------या शाळेला आम्ही नोटीस बजावली असून त्या नोटीस मध्ये कोणाच्या परवानगीने ही शाळा सुरू केली, कोणाची मान्यता घेतली असे अनेक प्रश्न त्यांना विचारण्यात आले आहे. आठ दिवसांत उत्तर न आल्यास या शाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव शासनाला आठ दिवसांनंतर पाठविला जाईल.- ऊर्मिला पारधे, शिक्षणाधिकारी, ठामपा*पालिकेने आमच्या निवेदनाची दखल घेतली असली तरी कारवाईच्या नावाथ्खाली काय करतात ते पाहणार अन्यथा मनसे स्टाईलने धडा शिकवला जाईल. या शाळेची मान्यता रद्द करावी या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. - किरण पाटील, मनविसे 

टॅग्स :thaneठाणेMNSमनसेPoliticsराजकारण