शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

वाढीव वीजबिलाविरोधात मनसे उभारणार जनआंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2020 18:03 IST

कोरोनामुळे रस्त्यावर उतरून आंदोलन करणे सुरक्षिततेच्या दृष्टीने हिताचे ठरणार नसल्याने मनसे ठाणे शहरात आगळेवेगळे जन आंदोलन करणार आहे.  

ठाणे - ज्या नागरिकांना वाढीव बिल आले आहेत अशा  नागरिकांनी avinashjadhavmns@gmail.com या मेल आयडिवर वीजबिल पाठवायचे आहे. ज्यांना मेल करणे शक्य नाही त्यांनी मनसेचे विष्णू नगर येथे असणाऱ्या मध्यवर्ती कार्यालयात बिलाची झेरॉक्स प्रत जमा करण्याचे आवाहन मनसे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव,  मनसे नेते अभिजित पानसे यांनी केले आहे. राज्यासह ठाण्यातील अनेक नागरिकांना वाढीव वीजबिल आले असून ही वाढीव वीज बिलं सरकारने माफ करावीत यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून मनसे आक्रमक झाली आहे. कोरोनामुळे रस्त्यावर उतरून आंदोलन करणे सुरक्षिततेच्या दृष्टीने हिताचे ठरणार नसल्याने मनसे ठाणे शहरात आगळेवेगळे जन आंदोलन करणार आहे.  यासंदर्भात आज मध्यवर्ती कार्यालयातून त्यांनी जन आंदोलनाची माहिती दिली आणि या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन देखील केले. कोरोनाच्या महामारीत नागरिकांचे नोकरी व्यवसायावर गदा आलेली असताना सरकारने वाढीव बिल आकारणी करून जनतेची चेष्टा सुरू केली आहे. ही बिले  माफ करावी यासाठी मनसेच्या माध्यमातून मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी विविध ठिकाणी महावितरण कार्यालयात धडक भेटी देऊन अधिकाऱ्यांना जाब विचारले. मात्र कोणत्याही प्रकारची समाधान कारण उत्तर मिळत नसल्याने मनसेने सध्याची राज्याची आणि विशेषतः ठाण्याची कोरोना परिस्थिती लक्षात घेऊन नेहमीच्या आक्रमक पद्धतीने खळखट्याक आंदोलन न करता जनतेच्या माध्यमातून 'मेल' आंदोलन छेडले आहे. या आंदोलनात नागरिकांनी प्रतिसाद द्यावा असे मनसे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी आवाहन केले आहे.