शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर स्कायवॉक महापालिकेकडे हस्तांतरित करण्याची मनसेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : स्टेशनच्या दोन्ही बाजूला उभारण्यात आलेल्या स्कायवॉकची दुरवस्था झाल्याने गर्दुल्ले, भुरटे चोर आदींच्या उपद्रवापासून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

उल्हासनगर : स्टेशनच्या दोन्ही बाजूला उभारण्यात आलेल्या स्कायवॉकची दुरवस्था झाल्याने गर्दुल्ले, भुरटे चोर आदींच्या उपद्रवापासून स्कायवॉक मुक्त करण्यासाठी महापालिकेकडे हस्तांतरित करण्याचे साकडे एमएमआरडीएचे अभियंता पी. जे. भांगरे यांना मनसेने घातले. गुन्हेगारांचा अड्डा झालेल्या स्कायवॉकबाबत निर्णय न घेतल्यास आंदोलनाचा इशारा मनसेने दिला.

उल्हासनगर रेल्वे स्टेशनच्या दोन्ही बाजूला नागरिकांच्या सोयीसाठी एमएमआरडीएने कोट्यवधी रुपये खर्चून स्कायवॉक बांधला. मात्र, स्कायवॉकची नियमित दुरुस्ती न झाल्याने, स्कायवॉकची दुरवस्था होऊन गर्दुल्ले, भुरटे चोरांचा अड्डा झाला. गेल्या आठवड्यात रात्रीचे ९ वाजता स्कायवॉकवर उभ्या असलेल्या १४ वर्षाच्या मुलीला ठार मारण्याची धमकी देऊन, एक तरुणाने रेल्वेच्या बंद कॉर्टर्समध्ये नेऊन बलात्कार केल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान, स्कायवॉकची देखभाल महापालिकेकडे हस्तांतरित करण्याच्या मागणीने जोर पकडला असून मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी एमएमआरडीएचे मुख्य अभियंता भांगरे यांची भेट घेतली.

स्टेशनच्या दोन्ही बाजूच्या स्कायवॉकवरील पत्रे, लोखंडी पाईप आदी साहित्य चोरीला गेले असून साफसफाईचे तीनतेरा वाजल्याने दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. स्कायवॉक पालिकेकडे हस्तांतरित केल्यास साफसफाई व निगा राखली जाईल, असे देशमुख म्हणाले. स्कायवॉकबाबत वेळीच निर्णय न घेतल्यास एमएमआरडीए आयुक्तांसमोर आंदोलनाचा इशारा देशमुख यांनी दिला. शिष्टमंडळामध्ये शालीग्राम सोनवणे, मुकेश सेठपलानी, तन्मेश देशमुख आदींचा समावेश होता.