शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

मनसे-भाजपा राड्याप्रकरणी २० जणांविरुद्ध गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 06:22 IST

आंबा विक्रीच्या एका अनधिकृत स्टॉलवर ठाणे महापालिकेने केलेल्या कारवाईवरून मनसे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये गुरुवारी रात्री राडा झाला होता.

ठाणे : आंबा विक्रीच्या एका अनधिकृत स्टॉलवर ठाणे महापालिकेने केलेल्या कारवाईवरून मनसे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये गुरुवारी रात्री राडा झाला होता. पोलिसांनी यावेळी सौम्य लाठीमार करून दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना पांगविले होते. यानंतर शुक्रवारी मनसेचे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव आणि भाजपचे शहर अध्यक्ष अ‍ॅड. संदीप लेले यांच्यासह २० जणांविरुद्ध मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी नौपाडा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.विष्णुनगर भागात लावलेल्या या अनधिकृत स्टॉलची तक्रार भाजपच्या नगरसेविकेने केली होती. तिची गंभीर दखल घेऊन ठाणे महापालिकेने तत्परतेने या स्टॉलवर कारवाई केली. याचाच राग आल्याने मनसेचे अविनाश जाधव आणि नगरसेवक सुनेश जोशी तसेच मृणाल पेंडसे यांच्यात चांगलाच वाद झाला. याच प्रकरणी भाजप आणि मनसेच्या २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. यापैकी काही जणांना अटक करून त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. तसेच चित्रीकरणाच्या आधारे उर्वरित कार्यकर्त्यांचाही शोध घेण्यात येत आहे. त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी दिली.

टॅग्स :thaneठाणे