शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
3
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
4
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
5
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
6
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
7
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
8
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
9
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
10
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
11
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
12
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
13
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
14
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
15
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
16
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
17
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
18
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
19
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
20
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!

सरकारी जागेवर शेडला परवानगी, कारवाई ऐवजी महापालिकेने संरक्षण दिल्याचा मनसेचा आरोप

By धीरज परब | Updated: October 27, 2023 10:04 IST

धीरज परब  मीरारोड - मीरारोडच्या गौरव गार्डन संकुलातील एका हॉटेलच्या गाळ्यांसमोरील सरकारी जागेवरच महापालिकेने वेदरशेडची परवानगी दिली .   ...

धीरज परब 

मीरारोड - मीरारोडच्या गौरव गार्डन संकुलातील एका हॉटेलच्या गाळ्यांसमोरील सरकारी जागेवरच महापालिकेने वेदरशेडची परवानगी दिली .   वर अतिक्रमणास संरक्षण दिल्याने महापालिका प्रभाग अधिकाऱ्यास निलंबित करा अशी मागणी मनसेने केली आहे . 

या प्रकरणी मनसेचे मीरा भाईंदर शहर अध्यक्ष हेमंत सावंत , विधासनभा मतदारसंघ अध्यक्ष सचिन पोपळे व वैशाली येरुणकर,  सचिव हरेश सुतार सह चंद्रशेखर जाधव , रेश्मा तपासे , रमाकांत माळी , रॉबर्ट डिसोझा , मनीष कामतेकर, गिरीश सोनी आदींनी महापालिका पत्रकार कक्षात पत्रकार परिषद मध्ये उपस्थित होते . 

गौरव गार्डन इमारतीतल्या दुकानांसमोरची जागा सरकारी असून देखील  प्रभाग अधिकारी प्रियांका भोसले यांनी गौरव होम्स नावाने हॉटेल समोरील जागेत जुलै मध्ये वेदरशेडची परवानगी दिली.  जिल्हाधिकारी , महापालिका आयुक्तां कडे तक्रारी केल्यावर तलाठी नितीन पिंगळे यांनी पाहणी करून सरकारी जागेत गौरव होम्स यांनी कुंपण , शेड , फर्निचर आदी अतिक्रमण केल्याचा अहवाल दिला . अपर तहसीलदार निलेश गौड यांनी ऑक्टोबर मध्ये गौरव होम्स यांना स्वतःहून अनधिकृत बांधकाम काढून घ्या अन्यथा कारवाई करू असे पत्र बजावले . पालिका उपायुक्त मारुती गायकवाड यांनी प्रभाग अधिकारी यांना १५ दिवसात नियमानुसार कार्यवाही करून अहवाल सादर करण्यास सांगितले .

 परंतु सरकारी जागेतल्या ह्या शेडला बेकायदा परवानगी देऊन नंतर त्यावर कारवाई करण्या ऐवजी संरक्षण दिल्याने प्रभाग अधिकारी यांना निलंबित करा अशी मागणी मनसेचे सावंत यांनी पत्रकार परिषदेत केली. सदर हॉटेलचे गाळे हे  विहंग हॉस्पिटॅलिटीच्या नावे असून येथे हॉटेल व बार उघडण्यासाठी नवघर पोलिसांनी सोसायटी कडे ना हरकत मागितल्याचे सावंत यांनी सांगितले . कारवाई न झाल्यास मनसे आंदोलन करेल असा इशारा त्यांनी दिला आहे . 

पूर्वी रहिवाश्यांच्या गृहसंस्थेने सुद्धा तक्रारी केल्या आहेत . सत्ताधारी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी २०१२ साली तत्कालीन महसूलमंत्री यांना पत्र लिहून विहंग कंपनीच्या हॉटेल समोरील सरकारी जागेत अनधिकृत बांधकाम न करता सदर शासकीय जमीन सुशोभीकरण साठी द्यावी अशी विनंती केली होती . तसे असताना सरकारी जागेत कोबा , कुंपण घालून वेदरशेडचे अनधिकृत बांधकाम झाले कसे ? त्यावर कारवाई का होत नाही ? असे सवाल मनसेने केले आहेत .