शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

Bhiwandi: भिवंडीत प्रभारी अधिकाऱ्यांची नियमबाह्य भरती केल्याचा मनसेचा आरोप

By नितीन पंडित | Updated: August 12, 2022 16:03 IST

Bhiwandi News: महाराष्ट्र नवनिर्माण महानगरपालिका कामगार कर्मचारी सेना भिवंडीच्या वतीने देखील भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे नामकरण करण्याचे लेखी पत्र भिवंडी मनपाचे प्रशासक तथा आयुक्त विजयकुमार म्हासाळ यांना देण्यात आले आहे,.

- नितिन पंडीत भिवंडी -  सध्या महाराष्ट्रात विविध शहरांचे नामकरण करून श्रेय घेण्यासाठी सर्व पक्षाचे राजकारणी सक्रिय झाले आहेत.अशातच महाराष्ट्र नवनिर्माण महानगरपालिका कामगार कर्मचारी सेना भिवंडीच्या वतीने देखील भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे नामकरण करण्याचे लेखी पत्र भिवंडी मनपाचे प्रशासक तथा आयुक्त विजयकुमार म्हासाळ यांना देऊन नियमबाह्य पद्धतीने केलेल्या प्रभारी नियुक्त्या येत्या १३ ऑगस्टपर्यंत रद्द कराव्यात.अन्यथा १५ ऑगस्ट रोजी भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे नामकरण करून भिवंडी निजामपूर शहर महानगर प्रभारी महानगरपालिका करणार आहे. असा थेट इशारा मनसे कामगार सेना युनिटचे भिवंडी शहराध्यक्ष संतोष साळवी यांनी मनपा प्रशासनाला दिला आहे.

५ सप्टेंबर २०१८ च्या नियमाप्रमाणे अतिरिक्त कार्यभार सोपवताना मार्गदर्शक सूचनांच्या नियमांची मनपा प्रशासनाकडून पायमल्ली झाली असल्याचा आरोप मनसेने केला आहे. शासनाच्या नियम व शर्तींचा भंग करत मनपा शिक्षण विभागातील नियुक्त्या शैक्षणिक अहर्ता नसताना,कॅडर नसताना,त्या विभागाचा अनुभव नसताना,वेतन समतुल्य नसताना देखील प्रभारी नियुक्त्या शिक्षण विभागाबरोबरच अन्य ठिकाणी झाल्या असून त्यातून आता भिवंडी मनपाचा भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आला असल्याची टीका देखील मनसेने केली असून मनपा प्रशासक तथा आयुक्त म्हासाळ हे देखील या नियम बाह्य पद्धतीने प्रभारी पद दिलेल्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी उभे असून या नियबाह्य प्रभारी अधिकाऱ्यांवर कुठलीच कारवाई आयुक्त करत नसून अशा अधिकाऱ्यांना आयुक्त पाठीशी घालत असून सध्या भिवंडी महानगरपालिकेत संपूर्ण विभागात जवळपास ७० टक्के प्रभारी पद नेमण्यात आली असून भिवंडी मनपाचा कारभार सध्या रामभरोसे सुरू असल्याचा आरोप देखील मनसेने केला आहे.

त्यामुळे करदात्या भिवंडीकर जनतेला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. जनतेची कामे अडकुन पडली आहेत.नियमबाह्य पद्धतीने सुरू असलेला हा कारभार तात्काळ बंद व्हावा यासाठी संतोष साळवी यांनी आयुक्तांसोबत चर्चा करून आपल्या मागण्यांचे पत्र आयुक्तांना दिले असून १३ तारखेपर्यंत जर त्यांनी ज्या प्रभारी नियुक्त्या रद्द नाही केल्या नाही तर १५ ऑगस्ट रोजी मनसेच्या वतीने भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे नामकरण करून भिवंडी निजामपूर शहर प्रभारी महानगरपालिका करण्यात येईल अशी माहिती युनिटचे कार्यध्यक्ष सचिन पाटील यांनी दिली आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडीthaneठाणे