शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

काळू धरणासाठी एमएमआरडीएचा ३५९ कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 23:54 IST

एमएमआरडीएने जुलैमध्ये झालेल्या आपल्या १४९व्या बैठकीत या २५९ कोटी १८ लाख रुपयांसह खासगी जमीन घेण्यासाठी अतिरिक्त १०० कोटी असे एकूण ३५९ कोटी १८ लाख रुपये देण्यास मान्यता दिली.

नारायण जाधव ठाणे : ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी तीन महापालिकांसह अंबरनाथ-बदलापूर नगरपालिका आणि त्यालगतच्या विस्तारित परिसरातील भविष्यातील पाण्याची निकड लक्षात घेऊन प्रस्तावित केलेल्या मुरबाड तालुक्यातील काळू धरणाच्या मार्गातील वन जमीन संपादित करण्यासाठीची स्थगिती मुंबई उच्च न्यायालयाने उठविली आहे. न्यायालयाने स्थगिती उठविल्यानंतर, या धरणासाठी आवश्यक वन जमीन आणि खासगी जमीन संपादित करण्यासाठी आवश्यक असलेले ३५९ कोटी १८ रुपये देण्यास एमएमआरडीएने आपल्या १४९ व्या बैठकीत मान्यता दिली आहे.

काळू धरणासाठी ६६१ कोटींची प्रशासकीय मान्यता एमएमआरडीएने आॅगस्ट, २००९ मध्ये दिली आहे. त्यानुसार, ११४० एमएलडी क्षमतेच्या या धरणाचे काम कोकण पाटबंधारे विकास महामंडळाकडून सुरू केले. मात्र, या धरणाखाली जाणारी ९९९.३२८ हेक्टर वन जमीन संपादित करण्यासाठी कोकण पाटबंधारे विकास महामंडळाने परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे याबाबत दाखल याचिकेची दखल घेऊन उच्च न्यायालयाने कामास मार्च, २०१२ मध्ये स्थगिती दिली, तेव्हापासून हे रखडले होते.

आता जानेवारी, २०२० मध्ये ही स्थगिती न्यायालयाने उठविली आहे. आतापर्यंत या धरणात एमएमआरडीएने ११४ कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून, वन जमीन संपादित करण्यासाठी कोकण पाटबंधारे विकास महामंडळाने २५९ कोटी १८ लाख रुपयांच्या मागणीचा प्रस्ताव एमएमआरडीएकडे पाठविला आहे. त्यानुसार, एमएमआरडीएने जुलैमध्ये झालेल्या आपल्या १४९व्या बैठकीत या २५९ कोटी १८ लाख रुपयांसह खासगी जमीन घेण्यासाठी अतिरिक्त १०० कोटी असे एकूण ३५९ कोटी १८ लाख रुपये देण्यास मान्यता दिली.जिल्हावासीयांना दिलासा?काळू धरण हे भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेता अत्यावश्यक आहे. त्यामुळे कोकण पाटबंधारे विकास महामंडळाने हा निधी वन विभागास देऊन काळू धरणाचे काम त्वरित सुरू करावे, असे आदेश या बैठकीत नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

टॅग्स :Damधरण