शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
3
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
4
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
5
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
6
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
7
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
8
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
9
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
10
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
11
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
12
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
13
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
14
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
15
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
16
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
17
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
18
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
19
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
20
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...

अंबरनाथमध्ये पाणीटंचाईवरून आमदार, नगरसेवकांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 00:25 IST

अधिकाऱ्यांना धरले धारेवर : प्राधिकरणाच्या कार्यालयास ठोकले टाळे

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये निर्माण झालेली पाणीटंचाई पाहता गुरुवारी सर्वपक्षीय नगरसेवकांनी एकत्रित येत एमआयडीसीचे व्हॉल्व उघडण्यासाठी आंदोलन केले. याची कल्पना येताच आमदार डॉ. बालाजी किणीकर घटनास्थळी दाखल झाले. जीवन प्राधिकरणाचे अधिकारी लोकप्रतिनिधींमध्ये वाद निर्माण करीत असल्याचा आरोप करीत आमदारांनी नगरसेवकांच्या आंदोलनात सहभागी होत प्राधिकरणाच्या कार्यालयालाच टाळे ठोकले.गेल्या महिन्याभरापासून शहरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शहराला मुबलक पाणीपुरवठा होत असतानाही प्राधिकरणाचे अधिकारी नागरिकांपर्यंत सुरळीत पाणीपुरवठा करीत नाहीत. त्यातच पाणी पळविले जात असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे. अंबरनाथचे पाणी नेमके जाते कोठे, असा प्रश्न उपस्थित करीत सर्वपक्षीय नगरसेवक एकत्र आले होते. शिवसेना, भाजप आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी शहरासाठी येणारे एमआयडीसीचे पाणी ज्या ठिकाणी अडविले जाते त्या ठिकाणी असलेला व्हॉल्व उघडत आंदोलन केले. याचवेळी आमदार डॉ. किणीकर हेही आले. नगरसेवकांचा संताप पाहून किणीकर यांनीही अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तसेच आमदारांची बदनामी करण्याचे काम अधिकारी करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. पाण्याची पळवापळवी केली जात असल्याचा आरोप नगरसेवक उमेश पाटील यांनी केला आहे. यावर किणीकर यांनीही नगरसेवकांना सोबत घेत थेट जीवन प्राधिकरणाचे कार्यालय गाठले. या कार्यालयात अधिकारी आणि कर्मचारी हजर नव्हते. त्यामुळे संतापलेल्या आमदार आणि नगरसेवकांनी प्राधिकरणाच्या कार्यालयालाच टाळे ठोकले. यासंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यावर शहरासाठी चार दशलक्ष लीटर पाणीपुरवठा कमी होत असल्याचे मत अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे शहरात पाण्याचे नियोजन करण्यात अडचणी येत असल्याची कबुली दिली. मात्र नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत मुबलक पाणी देण्याची मागणी लावून धरली.शहरासाठी येणारे पाणी पळविण्याचे काम राजकीय हेतूने होत आहे. पाण्याचे योग्य नियोजन करणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली केली जाते. यावरून प्राधिकरणाच्या भोंगळ कारभाराची प्रचिती येते.    - उमेश पाटील, नगरसेवकपाण्याच्या वादातून नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अंबरनाथकरांना मुबलक पाणी मिळावे हा आपला सातत्याने प्रयत्न असतो. मात्र काही अधिकारी आपले नाव पुढे करून आपली बदनामी करीत आहेत.    - डॉ. बालाजी किणीकर, आमदार