शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

आमदार-खासदार निधी अपघात रोखण्यासाठी वापरा, कपिल पाटील यांची सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 06:12 IST

अपघातांना आळा घालण्यासाठी आमदार-खासदारांचा निधी वापरण्याच्या सूचना जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष खासदार कपिल पाटील यांनी नुकत्याच घेतलेल्या बैठकीत दिल्या. ठाणे जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीची बैठक येथील नियोजन भवनमध्ये पार पडली. त्यात जिल्ह्यातील रस्तेसुरक्षेविषयी जोरदार चर्चा झाली.

ठाणे : अपघातांना आळा घालण्यासाठी आमदार-खासदारांचा निधी वापरण्याच्या सूचना जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष खासदार कपिल पाटील यांनी नुकत्याच घेतलेल्या बैठकीत दिल्या. ठाणे जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीची बैठक येथील नियोजन भवनमध्ये पार पडली. त्यात जिल्ह्यातील रस्तेसुरक्षेविषयी जोरदार चर्चा झाली.बैठकीला भिवंडीचे महापौर जावेद दळवी, मीरा-भार्इंदरच्या महापौर डिम्पल मेहता, बदलापूरच्या नगराध्यक्षा विजया राऊत, वाहतूक पोलीस उपायुक्त अमित काळे, उपजिल्हाधिकारी जे .बी. वळवी यांच्यासह आरटीओचे वरिष्ठ अधिकारी या वेळी उपस्थित होते.रस्ते सुरक्षेच्या उपाययोजनांसाठी आमदार-खासदार निधीबरोबरच कंपन्यांचा सामाजिक उत्तरदायित्व निधी (सीएसआर) देखील वापरण्याचे मार्गदर्शन त्यांनी या वेळी उपस्थितांना केले. बेजबाबदार व नियमबाह्य वाहतुकीमुळे होणाºया अपघातांना आळा घालण्यासाठी चालकांना प्रशिक्षण देण्यासाठी ट्रॅफिक पार्कतयार करावे, पार्र्किंगअभावी रस्त्याच्या दुतर्फा अवजड वाहने उभी केली असता रस्ता अरुंद होत असल्यामुळे अपघात होतात. यावर उपाययोजना म्हणून महापालिका क्षेत्रात अवजड वाहनांसाठी महापालिकांनी पार्किंग झोन तयार करणे अपेक्षित असल्याच्या सूचना पाटील यांनी केल्या.केंद्र व राज्य सरकारांच्या सर्व विभागांनी एकत्र येऊन समन्वय साधल्यास अपघातांचे प्रमाण कमी होईल. त्यामुळे रस्त्याचा डीपीआर (आराखडा) तयार करताना स्थानिक संस्थांना विश्वासात घेण्याचे मार्गदर्शनही पाटील यांनी या वेळी केले.वॉर्डनसाठी जिल्हा नियोजनमधूनदेखील निधी घेण्याची अपेक्षा त्यांनी या वेळी व्यक्त केली. वाहतूक पोलिसांच्या अपुºया संख्येमुळे वाहतूक नियंत्रणाला मर्यादा येतात, ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन पाटील यांनी वाहतूक वॉर्डन नियुक्तीसाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी मंजूर करण्याचे सूतोवाच या वेळी केले. 

टॅग्स :thaneठाणे