शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सरकार मच्छिमार, शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे आमदार गीता जैन यांचे आश्वासन 

By धीरज परब | Updated: May 25, 2023 18:43 IST

"उत्तन वासियांची राहती घरे सुरक्षितच"

मीरारोड - भाईंदरच्या उत्तन, चौक, पाली, डोंगरी, तारोडी गावातील स्थानिक भूमिपुत्र मच्छीमार व शेतकऱ्यांच्या सरकारी जमिनी वरील पूर्वी पासूनची राहती घरे ही सुरक्षित असून राज्य सरकार त्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे कोणी समाजकंटक भूमिपुत्रांना घाबरवत असेल तर घाबरण्याचे अजिबात कारण नाही, अशी ग्वाही आमदार गीता जैन यांनी उत्तन येथे गुरुवारी झालेल्या बैठकीत दिली . 

सदर गावांमध्ये भूमिपुत्र हे पिढ्या न पिढ्या रहात असून काही शासनाने देखील धोरण निश्चित करून राहती घरे संरक्षित केलेली आहेत. तरी देखील काही समाज कंटक हे भूमिपुत्रांच्या पिढीजात घरां बाबत तक्रारी करून त्यांना वेठीस धरत आहेत. त्यातच मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशा नंतर अपर तहसीलदार निलेश गौंड यांनी गायरान जमिनीवरील अतिक्रमणांना नोटीस बजावल्या नंतर समाज कंटक लोकां मध्ये आणखी भीतीचे वातावरण निर्माण करत असल्याचा आरोप आ. गीता जैन यांनी संत पिटर कोळी जमात सभागृहात गुरुवारी बैठकी दरम्यान केला. 

यावेळी  अपर तहसीलदार निलेश गौंड, महापालिका उपायुक्त मारुती गायकवाड, प्रभाग अधिकारी कांचन गायकवाड, मंडळ अधिकारी दिपक अहिरे, पोलीस निरीक्षक दादासाहेब करांडे,  माजी नगरसेवक चंद्रकांत वैती. राहिदास पाटील व शरद पाटील, कलमेत गौऱ्या (पाटील), शैलेश मामुनकर, ज्युड सामऱ्या, ऑस्टीन सामऱ्या, प्रकाश कोळी, बाबू कांबळे तसेच स्थानिक कोळी बांधव उपस्थित होते.

ग्रामस्थांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही . या बाबत  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणे झाले असून त्यांनी देखील स्थानिक भूमिपुत्रांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही याची खात्री दिली असल्याची माहिती आ. जैन यांनी दिली. 

ग्रामस्थानी त्यांच्या मनातील शंका बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यासमोर मांडल्या असता त्यांच्या शंकांचे योग्य ते निरासन करण्यात आले. काही समाजकंटक स्थानिकामध्ये अनेक प्रकारचे गैरसमज पसरवीत असून अश्या गैरसमजाला बळी न पाडण्याचे आवाहन जैन यांनी ग्रामस्थांना केले. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर