शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

उपमुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी आमदार गीता जैन यांना डावलले; भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहतांचा आरोप

By धीरज परब | Updated: May 14, 2024 15:01 IST

शिंदेसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही पासून शिंदेसेनेने आमचे वर्चस्व दाबण्याचे , वारंवार व व्यावसायिक त्रास देण्याचे आणि तोडफोडीचे राजकारण केल्याचा आरोप मीरा भाईंदर भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहतांनी केला होता .

मीरारोड - ठाणे लोकसभा मतदार संघाचे शिंदेसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी मंगळवारी सायंकाळी आयोजित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेसाठी आमदार गीता जैन यांना डावलण्यात आले आहे . माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या सभेच्या पोस्ट मध्ये आ . जैन यांना स्थानच दिलेले नाही . 

शिंदेसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही पासून शिंदेसेनेने आमचे वर्चस्व दाबण्याचे , वारंवार व व्यावसायिक त्रास देण्याचे आणि तोडफोडीचे राजकारण केल्याचा आरोप मीरा भाईंदर भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहतांनी केला होता . परंतु नंतर मात्र मेहतांनी भूमिका बदलत शिंदेसने समोर नमते घेत नरेश म्हस्के यांचा प्रचार सुरु केला. 

ठाणे लोकसभा मतदार संघ वर भाजपाने यंदा दावा ठोकल्याने महायुतीत ह्या मतदारसंघाचे वाटप लांबणीवर पडले होते . भाजपा कडून दावा करताना  भाजपाचे चार आमदार असल्याचा मुद्दा देखील पुढे केला गेला होता . त्यात मेहतांचा पराभव करून निवडून आलेल्या आ . गीता जैन यांचा देखील समावेश होता . ठाणे येथील भाजपाच्या बैठकीला सुद्धा आ . जैन यांना बोलावण्यात आले होते . 

एकीकडे भाजपा आणि आ . जैन ह्या एकमेकांचे असल्याचा दावा करत असताना दुसरीकडे १४ मे रोजी सायंकाळी मीरारोड येथील सेव्हन स्क्वेअर शाळेच्या मैदानात होणाऱ्या जाहीर सभेच्या जाहिरातीत मेहतांनी आ . जैन यांना डावलले आहे . मेहतांच्या समाज माध्यमावरील जाहिरातीत आ . गीता जैन यांचे नाव वा छायाचित्रच नाही . सदर पोस्ट मेहता समर्थकांनी देखील शेअर केल्या आहेत .  भाजपातील ह्या अंतर्गत गटबाजीचा फटका शिंदे सेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांना बसण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे .