शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
2
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
3
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
4
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
5
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
6
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
7
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
8
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
9
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
10
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
11
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
12
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
13
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
14
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी
15
संतापजनक! २ मुलांची आई पडली १७ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात, दोघंही झाले फरार; आता महिलेवर POCSO कारवाई!
16
जरांगेंचा होकार, पण जर जीआरमध्ये काही दगा फटका झाला तर...; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा
17
"मला मावशीच्या मिठीतच शांतता मिळते"; पतीचं बोलणं मनाला लागलं, नवविवाहितेनं टोकाचं पाऊल उचललं!
18
रात्री ९ वाजेपर्यंत मुंबई खाली करतो, मराठ्यांची पोरं नाचत जातील, पण...; मनोज जरांगेंचा विखेंना शब्द
19
श्रीसंतची दुखापत अन् RR फ्रँचायझीचा ८२ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा! विमा कंपनीची सर्वोच्च न्यायालयात धाव
20
Manoj Jarange: मनोज जरांगे आजच उपोषण सोडणार? हैदराबाद गॅझेटचा जीआर निघणार, सातारा गॅझेटीयरची जबाबदारी शिवेंद्रराजेंनी घेतली...

आमदार गणपत गायकवाड यांनी घेतला जेसीबीचा ताबा; आशेळेपाड्यात नालेसफाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 23:48 IST

गणपत गायकवाड यांनी तेथे पोहोचून चक्क नालेसफाई करणाऱ्या जेसीबी चालकाच्या केबीनचा ताबा घेत त्याच्याकडून नाल्यातील गाळ काढून घेतला.

कल्याण : केडीएमसी दरवर्षी नालेसफाईवर कोट्यवधी रुपये खर्च करते. मात्र, नालेसफाईचे केवळ व्हिडीओ शुटिंग केले जाते. प्रत्यक्षात नालेसफाई होत नाही. तो केवळ एक दिखावा असतो, अशी टीका होत असल्याने आयुक्त गोविंद बोडके यांनी मंगळवारी नालेसफाईची पाहणी केली. यावेळी त्यांच्या उपस्थितीत पूर्वेतील आशेळेपाडा येथे नालसफाई सुरू असताना तेथे कल्याण पूर्वेचे आमदार गणपत गायकवाड यांनी तेथे पोहोचून चक्क नालेसफाई करणाऱ्या जेसीबी चालकाच्या केबीनचा ताबा घेत त्याच्याकडून नाल्यातील गाळ काढून घेतला.

‘प्लास्टिक कचºयामुळे तुंबले नाले’ या मथळ्याखाली ‘लोकमत’च्या ‘हॅलो ठाणे’ पुरवणीत ३ जूनला वृत्त प्रसिद्ध झाले होते. तर, ४ जूनच्या अंकात ‘शूट-आउट’ या सदरात तुंबलेल्या नाल्यांची छायाचित्रे प्रसिद्ध करून महापालिकेच्या नालेसफाईच्या दाव्याची पोलखोल करण्यात आली. गायकवाड यांनी त्याची दखल घेत नालेसफाईच्या कामात सहभाग घेतला. ते पाहून बोडके हेही चक्रावून गेले.

पावसाळा आला तरी कल्याण पूर्वेतील नाल्यांची स्वच्छता करण्यात आलेली नाही. तर, अनेक नाल्यांतील गाळ व कचरा काढून तेथेच टाकण्यात आला आहे. त्यामुळे पादचारी व रहिवाशांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, महापालिकेच्या कंत्राटदाराने सोमवारीच स्वच्छ केलेल्या नाल्यात मंगळवारी मोठ्या प्रमाणात गाळ व कचरा साचले आहे.

बोडके यांनी स्वत:च मंगळवारी ठिकठिकाणी जाऊन नालेसफाईच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केल्याने या कामाला गती आल्याचे दिसून आले. आयुक्त स्वत: पाहणी करीत असल्याने आशेळेपाडा येथील नाल्यातील गाळ काढण्यात येत असलेल्या ठिकाणी गायकवाड यांनी धाव घेतली. यावेळी त्यांनी चक्क जेसीबीचा ताबा घेतला. पायात गमबूट घालून नाल्यात उतरण्याची त्यांची तयारी होती.

पहिल्या पावसातच नाले तुंबतातगायकवाड म्हणाले की, नालेसफाई दरवर्षी योग्य प्रकारे केली जात नाही. नालेसफाईचा दिखावा केला जातो. त्यामुळे पहिल्या पावसात नाले तुंबतात. साचलेले पाणी नागरिकांच्या चाळवजा घरांमध्ये शिरते. पूरसदृश परिस्थिती उद्भवते. नालेसफाईच्या कामात भ्रष्टाचार केला जातो. नालेसफाईच्या कामातून अधिकारी व लोकप्रतिनिधी आपले खिसे भरण्यात धन्यता मानतात. त्यामुळे नालेसफाई होतच नाही. ही बाब लक्षात घेता आज प्रत्यक्ष नालेसफाई कामाच्या ठिकाणी गेल्यावर काम गतीने करण्यात आल्याचे पाहावयास मिळाले.