शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

आमदार कन्येची दिवाळी सायबर लुटारूंनी केली कडू; नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

By धीरज परब | Updated: November 11, 2023 12:43 IST

या प्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

मीरारोड - मीरा भाईंदरच्या आमदार गीता जैन यांच्या कन्या स्नेहा सकलेजा यांना सासूबाईंनी मागवलेल्या मिठाईचे ऑनलाईन पैसे देण्यात सायबर लुटारूंनी ८० हजार रुपयांना गंडवले आहे . या प्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . तर इतके पैसे भरून देखील आमदार कन्येच्या सासूबाईंना मिठाई काही मिळाली नाही . 

सायबर फसवणुकीच्या घटना वाढत असतानाच पोलिसां कडून सुद्धा सातत्याने जनजागृती व काय काळजी घ्यावी याचे आवाहन केले जाते . तरी देखील अनोळखी लोकांच्या सांगण्यानुसार व्यवहाराच्या संदर्भात प्रक्रिया करून स्वतःची फसवणूक करून घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे .विशेष म्हणजे त्यात शिक्षित आणि उच्चशिक्षितांची संख्या जास्त आहे . सायबर लुटारूंच्या फसवणुकीला आमदार गीता जैन यांच्या सुशिक्षित व व्यवसायीक असलेल्या कन्या स्नेहा ह्या बळी पडल्या आहेत . 

स्नेहा ह्यां त्यांच्या सासू प्रतिभा सकलेजा यांनी कॉल करून सांगितले कि , तिवारी ब्रदर्स कडून ऑनलाईन ऑर्डरने मिठाई मागवली असून त्याचे ऑनलाईन ४८० रुपये क्यूआर कोड द्वारे द्यायचे आहेत . स्नेहा यांनी क्यूआर कोड पाठवण्यास सांगितले असता सासू यांनी तो पाठवला . त्या क्यूआर कोड वर स्नेहा यांनी जीपे द्वारे ४८० रुपये भरले . 

मात्र त्यांच्या सासू यांना स्वतःला तिवारी ब्रदर्स मधून बोलतो सांगणाऱ्याचे कॉल येत असल्याने त्यांनी स्नेहा यांचा नंबर दिला . स्नेहा यांना व्हॉट्सअप वर अनोळखी क्रमांकावरून कॉल आला आणि आपण तिवारी ब्रदर्स मधून बोलत तुम्ही जे ४८० रुपये भरले त्याचे जीएसटी साठी नोट हवे आहे असे सांगितले . त्या नंतर त्या अनोळखी व्यक्तीने सांगितले त्या प्रमाणे स्नेहा यांनी आकडे नमूद केले व टाईप केले असता सुरवातीला ३९ हजार ५०६ रुपये त्यांच्या खात्यातून गेले . 

स्नेहा यांनी त्या बाबत विचारणा केली असता समोरच्या व्यक्तीने माफी मागून तुमचे पैसे परत खात्यात जमा होतील , मी सांगतो तसे टाईप करा म्हटले . स्नेहा यांनी पुन्हा त्याप्रमाणे केले असता त्यांच्या खात्यातून आणखी ३९ हजार ५०६ रुपये कमी झाले . स्नेहा यांनी अनोळखी व्यक्तीला कॉल केला असता त्याने कट करून नंतर नंबर ब्लॉक केला . या घटने प्रकरणी स्नेहा यांच्या फिर्यादी वरून नवघर पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे . वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक केदारे तपास करत आहेत . वास्तविक सायबर लुटारू हे कोडचे आकडे  सांगून प्रत्यक्षात रक्कम भरून घेत असतात .