शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

आमदार आयलानी यांची मध्यस्थीची भूमिका? उल्हासनगर भाजप नेत्यांमध्ये भ्रष्टाचाराबाबत खदखद

By सदानंद नाईक | Updated: March 15, 2024 19:54 IST

शिवसेना शिंदे गटाच्या एका पदाधिकाऱ्यावर आरोप केल्याने, शिवसेना शिंदे गट व भाजपातील वाद चव्हाट्यावर आला होता.

उल्हासनगर: भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी, आमदार कुमार आयलानी यांच्यानंतर माजी जिल्हाध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांनी शहर विकास कामात भ्रष्टाचार होत असल्याचे वक्तव्य गुरुवारच्या पत्रकार परिषदेत केल्याने एकच खळबळ उडाली. त्यामुळे शहरात सुरू असलेल्या विकास कामात भ्रष्टाचार आहे का? असा प्रश्न नागरिकांना पडला असून भाजप नेत्यांची खदखद केंव्हाही बाहेर पडण्याची शक्यता आहे.

उल्हासनगरात कधी नव्हे हजारो कोटीच्या निधीतून विकास कामाला सुरवात झाली. मात्र या विकास कामावरून शिवसेना शिंदे गट व भाजप पदाधिकारी आमने-सामने आले आहे. दिड महिन्यांपूर्वी शहरातील विविध विकास कामात अनियमितता असल्याचा आरोप भाजपचे आमदार कुमार आयलानी, शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी पत्रकार परिषद घेऊन केला. १०० कोटीच्या भ्रष्टाचाराचा आरोप करून खळबळ उडून दिली. तसेच शिवसेना शिंदे गटाच्या एका पदाधिकार्यावर आरोप केल्याने, शिवसेना शिंदे गट व भाजपातील वाद चव्हाट्यावर आला होता. 

शहरातील बांधकामे व धोकादायक इमारती नियमित करण्यासाठी शासनाने, नव्याने अध्यादेश काढल्याच्या निमित्ताने गुरवारी आमदार कुमार आयलानी यांनी आमदार कार्यालयात पत्रकार परिषद बोलाविली होती. बैठकीला आमदार आयलानीसह शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी, माजी जिल्हाध्यक्ष जमनुदास पुरस्वानी, लाल पंजाबी, प्रकाश नाथानी आदीजन उपस्थित होते. पत्रकार परिषद सुरू असताना माजी जिल्हाध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांनी शहर विकास कामात मोठा भ्रष्टाचार होत असल्याचे सांगितले. यावेळी आमदार कुमार आयलानी यांनी त्यांची समजूत काढून बोलण्यास मनाई केली. तरीही मी वेगळी पत्रकार परिषद घेतो. असे पुरस्वानी म्हणाले. यांप्रकाराने शहरातील विकास कामात भ्रष्टाचार सुरू असल्याची चर्चा रंगली असून भाजप नेत्यात या भ्रष्टाचाराबाबत खदखद असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे.

महायुतीच्या नेत्यांची पत्रकारपरिषद शासनाने बांधकामे नियमित करण्याचा जीआर काढला असून रेडिरेकनर दर १० टक्के ठेवला. त्यामुळे बांधकाम नियमित करण्याचे स्वप्न पूर्ण होणार असल्याची माहिती देण्यासाठी गुरवारी भाजपने पत्रकार परिषद घेत दिली. मात्र त्याच विषयावर महायुतीतील नेत्यांनी शुक्रवारी पुन्हा पत्रकार घेतली. यावेळी आमदार आयलानी, प्रदीप रामचंदानी, जमनुदास पुरस्वानी, शिवसेनेचे अरुण अशान, रमेश चव्हाण, नाना बागुल, राष्ट्रवादीचे भारत गंगोत्री, रिपाइंचे भगवान भालेराव आदीजन उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणेulhasnagarउल्हासनगर