शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

मितेश जगताप आत्महत्या प्रकरण: कुटुंबीयांना गुन्हा मागे घेण्यासाठी धमकीचे पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 16:34 IST

टिटवाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रहाणाऱ्या मितेश जगताप या तरुणाने सहा महिन्यांपूर्वी आत्महत्या केली होती. पोलिसांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा कुटुंबाने आरोप केला होता. मात्र पोलिसांनी गुन्हा न केल्याने अखेर या कुटुंबीयांनी उच्च न्यायालयाने या प्रकरणाची धाव घेतली होती.

कल्याण : टिटवाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रहाणाऱ्या मितेश जगताप या तरुणाने सहा महिन्यांपूर्वी आत्महत्या केली होती. पोलिसांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा कुटुंबाने आरोप केला होता. मात्र पोलिसांनी गुन्हा न केल्याने अखेर या कुटुंबीयांनी उच्च न्यायालयाने या प्रकरणाची धाव घेतली होती. न्यायालयाने गंभीर दखल घेत डिसेंबर महिन्यात टिटवाळा पोलिसांना चार आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. दरम्यान हे प्रकरण मागे घेण्यासाठी शनिवारी अज्ञात व्यक्तीने जगताप यांना एक निनावी पत्र पाठवले आहे. त्या पत्रात पोलिसांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी जगताप कुटुंबीयांना धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मितेशने टिटवाळ्यातील पोलिसांच्या जाचाला कंटाळून आत्‍महत्‍या केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला होता. तसेच, कुटुंबीयांनाही पोलिसी जाच सुरू झाल्याने ते टिटवाळ्यातील राहते घर सोडून डोंबिवलीला राहायला गेले. न्याय मिळविण्यासाठी तसेच दोषींवर कारवाईसाठी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र रविवारी पुष्पा जगताप या टिटवाळा मधील जुन्या घरी गेले असता त्यांना पाकिटातील धमकीचे निनावी पत्र मिळाले. या पत्रात पोलिसांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तो लगेच मागे घ्या. पोलिस जेवढे पैसे देतात तेवढे पैसे घ्या, गप्प बसा. कमी असेल तर सांगा जास्त पैसे मिळतील. पोलिसात विरोधात कोर्टात जाऊन माघार घ्यायची आहे. त्यात तुमचे भले आहे. तक्रारदार राहिले नाहीत तर केस रद्द होईल. बघा विचार करा आता फक्त गोडीत समज देतो. नंतर मात्र सर्व काही हातून जाईल. काही दिवस तुमच्या हाती आहेत. काळजी घ्या अशा आशयाचे धमकी वजा निनावी पत्र अज्ञात व्यक्तीने लिहिले आहे. 

या निनावी पत्रामुळे जगताप कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्‍या अज्ञात व्यक्ती विरोधात मयत मितेशची आई पुष्पा जगताप यांनी टिटवाळा पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणातील दोघे दोषी पोलिसाचा न्यायालयात समोर अहवाल सादर केला जाणार असल्याने ते अटकपूर्व जमीन मिळविण्यासाठी प्रयत्न करीत असल्‍याचे समजते. ही केस कोर्टासमोर सादर होऊ नये म्हणून केस मागे घेण्यासाठी निनावीपत्राद्वारे धमकाविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप मयत मितेशची आई पुष्पा जगताप यांनी केला आहे. न्यायालयाने दोषी आरोपींना कडक शिक्षा करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान,  याबाबत टिटवाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे यांच्याशी संपर्क साधला असता हे प्रकरण न्याय प्रविष्ठ असल्याने याबद्दल बोलणे उचित होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :kalyanकल्याण