शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

बेपत्ता अल्पवयीन मुलीचा ठाणे गुन्हे शाखेने लावला तासाभरात छडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 00:18 IST

नववीमध्ये कमी गुण मिळाल्यामुळे आई वडिल रागावण्याची धास्ती असलेल्या १५ वर्षीय विद्यार्थीनीने अचानक घर सोडले. याप्रकरणी अपहरणाची तक्रार दाखल झाल्यानंतर ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट ५ च्या पथकाने अवघ्या तासाभरातच मोठया कौशल्याने भिवंडीतून तिचा शोध घेतला.

ठळक मुद्देनववीमध्ये मिळाले कमी गुण आई वडिल रागावण्याची होती धास्तीचितळसर पोलीस ठाण्यात अपरहणाची तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : पोखरण रोड क्र मांक-२, लोकपुरम येथून बेपत्ता झालेल्या १५ वर्षीय मुलीचा अवघ्या तासाभरातच शोध घेण्यात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-५ च्या पथकाला बुधवारी यश आले. नववीमध्ये कमी गुण मिळाल्यामुळे आई -र् वडील रागावतील, या धास्तीपोटी तिने घरातून पळ काढला होता. याप्रकरणी तिच्या पालकांनी चितळसर पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्र ार दाखल केली होती.ठाण्यातील लोकपुरम भागातील ही विद्यार्थिनी घरातून निघून गेल्याची तक्र ार तिच्या पालकांनी चितळसर पोलीस ठाण्यात २ डिसेंबर रोजी दाखल केली. ती सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घरातून गेल्यानंतर रात्री ९ वाजण्याच्या सुमारास याप्रकरणी अपहरणाची तक्र ार तिच्या पालकांनी दाखल केली. ही माहिती मिळताच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे वागळे इस्टेट युनिट-५ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांच्या पथकाने भिवंडीतील साईबाबा मंदिर परिसरातून तिचा शोध घेतला. नववीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याने घरातील रागावतील, या धास्तीने घरातील कोणालाही न सांगता भिवंडीतील मैत्रिणीकडे गेल्याचे चौकशीमध्ये तिने पोलिसांना सांगितले. ती ज्या ठिकाणी मिळाली, तिथे तिचे इतरही मित्रमैत्रिणी जमले होते. विश्वासात घेऊन तिला पोलिसांनी सुखरूप पालकांच्या स्वाधीन केले.परीक्षेतील गुण हेच सर्वकाही नाही. मुलांच्या इतरही कलागुणांकडे लक्ष देऊन त्यादृष्टीने त्यांचा विकास करता येऊ शकतो. मुलांना कमी गुण मिळाल्यानंतर ते अशा प्रकारे दडपणाखाली येणार नाहीत, याचीही काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.सहायक पोलीस आयुक्त किसन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक घोडके, सहायक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे, हवालदार विजयकुमार गो-हे, राजेश क्षित्रय, सागर सुरळकर आण िपोलीस नाईक कल्पना तावरे आदींच्या पथकाने ही कामिगरी केली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीMissingबेपत्ता होणं