शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

ड्रेनेजच्या कामाची ३० लाखांची फाइल गहाळ?; अपक्ष नगरसेवकाचा स्थायीत गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2020 07:14 IST

पोलिसात तक्रार करण्याचा इशारा

कल्याण : केडीएमसीतील सत्ताधारी शिवसेनेला पाठिंबा देणारे अपक्ष नगरसेवक कासीफ तानकी यांच्या प्रभागातील ड्रेनेजच्या विकासकामाची ३० लाख रुपये निधीची फाइल गहाळ झाली आहे. त्यामुळे तीन वर्षांपासून त्यांच्या प्रभागात हे काम होऊ शकलेले नाही. याप्रकरणी तानकी यांनी शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत हा प्रश्न उपस्थित करून फाइल गहाळ झाल्याचा गौप्यस्फोट केला. त्यावर तानकी यांनी सबुरीने घ्यावे. अन्यथा, पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल करावी, असा सल्ला सभापती विकास म्हात्रे यांनी त्यांना दिला आहे.

केडीएमसीच्या २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत तानकी हे कल्याण पश्चिमेतील एका प्रभागातून निवडून आले. त्यावेळी त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला. भाजपनेही त्यांना आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तानकी यांनी शिवसेनेला समर्थन देऊनदेखील त्यांच्या प्रभागात ड्रेनेजची ३० लाख रुपये खर्चाची फाइल तयार केली. ही फाइल मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असताना आता मिळेनाशी झालेली आहे. तीन वर्षांपासून ते याप्रकरणी पाठपुरावा करत आहेत. यापूर्वी तानकी हे एक वर्षाची गॅप सोडून स्थायी समिती सदस्य होते. आताही शिवसेनेने त्यांना स्थायी समिती सदस्यपदाची संधी दिली आहे. शुक्रवारी पहिल्याच समितीच्या बैठकीत तानकी यांचा आवाज वाढला. त्यावर सभापती यांनी सबुरीचा सल्ला दिला. हा विषय पटलावर नाही. सभेच्या शेवटी घेऊ, असे सांगितले. ३० लाख रुपये खर्चाच्या विकासकामाची फाइल गहाळ झाली की, चोरीला गेली, याचे उत्तर प्रशासनाने आजच द्यावे, अशी जोरदार मागणी त्यांनी केली. त्यावर सभापतींनी फाइल शोधून काढा, असे आदेश प्रशासनाला दिले आहे. पुढील सभेपर्यंत फाइल मिळाली नाही, तर तानकी यांना पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार करण्याचा मार्ग मोकळा आहे.

यापूर्वीही प्रभागातील विकासकामे प्रभाग मुस्लिमबहुल असल्याने केली जात नसल्याचा आरोप करीत स्थायी समितीच्या बैठकीत दोन वर्षांपूर्वी तानकी यांनी आवाज उठवत ठिय्या आंदोलनाचा प्रयत्न केला होता. त्यानंतर, विकासकामाविषयी तानकी पुन्हा आक्रमक झाले आहे. आपल्या प्रभागात कामे होत नसल्याविषयी त्यांनी हतबलता व्यक्त केली. तानकी हे त्यांच्या फाइलविषयी पोटतिडकीने बोलत असताना भाजप सदस्यांनी दबक्या आवाजात त्यांच्यावर भाजपने अन्याय केला नसून, शिवसेनेने केला आहे. भाजप त्यांना न्याय देणार आहे, असे मत व्यक्त केले. या प्रकारामुळे राजकारण चांगलेच तापण्याची शक्यता आहे.फाइल गहाळ करणारे कोण?विकासकामांच्या फाइल्स मंजूर करण्यासाठी सदस्यांना स्वत:ला महापालिकेत चकरा माराव्या लागतात. महिला-बालकल्याण समितीच्या माजी सभापती वैशाली पाटील या तर आयुक्तांच्या दालनात रडल्या होत्या. त्याचबरोबर शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्या बसपाच्या नगरसेविका सोनी अहिरे यांनाही महासभेत कामे मंजूर होत नसल्याने रडू कोसळले होते. वैशाली पाटील यांच्या प्रभागात ५० लाख रुपये खर्चाची भाजी मंडईची फाइल तयार करण्यात आली होती. ती हरवली होती. मात्र, त्यानंतर ती सापडली. आता त्याच फाइलमधील दोन महत्त्वाचे कागद गहाळ आहे. च्त्यामुळे तानकी यांनी केलेल्या आरोपाच्या पुनरावृत्तीने फाइल्स गहाळ करणारे कोण अधिकारी की सत्तेमधील लोक, असा संशयास्पद प्रश्न उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका