शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

दु:खावेग सावरून मिळवले ८० टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 00:56 IST

आपल्या चुलतभावाच्या मृत्यूचे दु:ख बाजूला सारून त्याने मनाची तयारी केली.

ठाणे : आपल्या चुलतभावाच्या मृत्यूचे दु:ख बाजूला सारून त्याने मनाची तयारी केली. मानसिक धक्क्यातून सावरत अभ्यासावर लक्ष केंद्रित करून बारावीची परीक्षा दिली आणि डीएव्ही महाविद्यालयातून वाणिज्य शाखेतून तब्बल ८० टक्के गुणांसह यश मिळवले आहे, ते दिवा येथील निखिल भोसले या तरुणाने.काही कारणास्तव राहत्या घरी निखिलचा चुलत भाऊ सिद्धेशचा मृत्यू झाला. सिद्धेशच्या अकाली जाण्याचा धक्का बसलेल्या निखिलने काही दिवस जेवण, अभ्यास सर्वच सोडून दिले होते. निखिल हा बारावीची परीक्षा देईल की नाही, याबद्दलही साशंकता होती. मात्र, पुतण्याच्या मृत्यूचे दु:ख काही काळ बाजूला ठेवून बळीराम अर्थात निखिलचे वडील यांनी आपल्या दोन्ही मुलांना समजावून अभ्यास करण्याच्या दृष्टीने धीर दिला. निखिलचा लहान भाऊ रोहित हासुद्धा यंदा दहावीला होता. त्यालाही परीक्षा देण्यासाठी धीर दिला. वडिलांच्या आधारानंतर निखिलने अभ्यास केला. प्रचंड मेहनत केली आणि परीक्षा दिली.बुधवारी लागलेल्या निकालानुसार वाणिज्य शाखेत शिक्षण घेणाऱ्या निखिलला ८० टक्के गुण मिळाले आहेत. त्याच्या या यशाबद्दल सर्वच स्तरांतून त्याचे कौतुक होत आहे. दिवा प्रवासी संघटनेनेही गुरुवारी त्याचे पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले.

टॅग्स :HSC Result 2018बारावी निकाल २०१८