शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

वर्गखोल्यांच्या कामात गैरव्यवहार; ११५० खोल्यांवर ३९ कोटी खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 01:30 IST

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला चौकशीसाठी पत्र

- हितेन नाईक पालघर : पालघर जिल्हा परिषदेंतर्गत प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीच्या नावाखाली आठ तालुक्यांत २०१५ ते २०२० दरम्यान एक हजार १५० वर्गखोल्यांवर ३९ कोटी ५२ लाख नऊ हजार ३५८ रुपयांचा खर्च करण्यात आला. मात्र, या कामात मोठा गैरव्यवहार झाला असून त्याचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, वरळी यांनी करावा, असे पत्र देण्यात आले आहे. अत्यंत बोगस पद्धतीने ही कामे करण्यात आली असून या प्रकरणात काही माजी जिल्हा परिषद पदाधिकारी, अभियंते, ठेकेदार यांची अभद्र युती झाल्याची चर्चा आहे. दरम्यान, यासंदर्भात शुक्रवारी सकाळी ११ वाजता जिल्हा परिषदेची बैठक होणार आहे.

जिल्हा परिषदेची निर्मिती जिल्ह्याच्या विकासासाठी होण्याऐवजी मिळालेल्या निधीचा विनियोग विकासासाठी कमी आणि गैरव्यवहारासाठी जास्त झाल्याच्या अनेक बाबी उघड होत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेचे कार्यालय म्हणजे भ्रष्टाचाराचे आगार बनल्याचे चित्र अनुकंपा भरती घोटाळा, परिचर घोटाळा, आरोग्य विभागाचा निकृष्ट बारकोड खरेदी घोटाळा आदी घोटाळ्यांद्वारे सर्वांच्या समोर आले आहे.

शिक्षण विभाग म्हणजे शिक्षक बदलीच्या कामासाठी पैसे घेण्याचे कुरण बनल्याची बाब माजी शिक्षणाधिकारी देसले यांना लाचलुचपत विभागाने पैसे घेताना रंगेहाथ पकडल्याने समोर आली होती. त्यांच्या मूळ गावी असलेल्या घरात लाचलुचपत विभागाने घातलेल्या धाडीत लाखो रुपयांची रोख रक्कमही सापडली होती.

जिल्हा परिषदेचे २०१५ पासून अध्यक्षपद भाजपकडे, तर उपाध्यक्षपद शिवसेनेकडे होते. त्यांच्या पाच वर्षांच्या काळात अनेक घोटाळे झाले असताना आता नव्याने प्राथमिक शाळांच्या बांधकाम दुरुस्तीच्या नावाखाली ३९ कोटी ५२ लाख नऊ हजार ३५८ रुपयांचा खर्च झाल्याचे दाखविण्यात आले आहे. या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याने चौकशी करण्याचा ठराव उपाध्यक्ष निलेश सांबरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे.

शाळा दुरुस्तीच्या नावाखाली पत्रे बदलणे, खिडक्या व दरवाजे बदलणे आदी वरवरची कामे करून, रंगरंगोटी करून लाखो रुपयांची बोगस बिले काढल्याची धक्कादायक बाब नवीन नियुक्त पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आली आहे. त्यामुळे काही माजी जिल्हा परिषद पदाधिकारी, संबंधित अभियंते, विभागप्रमुख यांची निर्माण झालेली साखळी मोडून काढण्याचा संकल्प नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

२०१५-१६ अंतर्गत जिल्ह्यातील आठ तालुक्यांत दुरुस्तीच्या नावाखाली काढण्यात आलेल्या एकूण कामांतर्गत ४०३ वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी सहा कोटी ३४ लाख आठ हजार ८४२ एवढी रक्कम खर्च करण्यात आली. २०१६-१७ अंतर्गत २८४ कामांतर्गत ४४४ वर्गखोल्यांसाठी सात कोटी ३८ लाख २४ हजार ८०९ रुपये, २०१७-१८ अंतर्गत २५६ कामांतर्गत आठ कोटी २३ लाख ४७ हजार ६२७ रुपये, २०१८-१९ अंतर्गत २४१ कामांतर्गत आठ कोटी ६८ लाख ४० हजार २२५ रुपये, तर २०१९-२० मध्ये १६९ कामांतर्गत नऊ कोटी १८ लाख ४७ हजार ८५५ रुपये असा एकूण ३९ कोटी ५२ लाख नऊ हजार ३५८ हजारांचा खर्च झाला आहे. त्यांनी आठही तालुक्यांत झालेल्या या शाळा व वर्गखोल्या दुरुस्तीच्या कामांची तपासणी केली. या शाळांवर कोट्यवधी रुपये खर्च होऊनही त्या आजही गळत आहेत.

दुरुस्तीच्या नावाखाली नागरिकांच्या पैशांतून उभ्या निधीचा असा दुरुपयोग होत आहे. दरम्यान, यासंदर्भात माजी जि.प. उपाध्यक्ष निलेश गंधे यांच्याशी अनेक वेळा संपर्क करून टेक्स्ट मेसेजही केला, मात्र त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही.

शाळा दुरुस्ती, मैदान सपाटीकरण व शिक्षक बदली यामध्ये मोठा आर्थिक भ्रष्टाचार झाला असल्याचे शिक्षण समिती सदस्यांकडून कळल्यावर काही बाबी तपासल्यावर त्यात तथ्यता असल्याचे दिसून आल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, वरळी यांनी चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, असा ठराव घेण्यात आला आहे.- निलेश सांबरे,उपाध्यक्ष, जि.प. पालघर

टॅग्स :Schoolशाळा