शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Mira Road: २० वर्षांपासून ज्याला मदत केली त्यानेच माजी नगरसेवकाच्या घरावर मारला ७५ लाखांचा डल्ला 

By धीरज परब | Updated: April 26, 2023 11:24 IST

Mira Road News: सुमारे २० वर्षांपासून ज्याच्या साठी सर्वती मदत केली त्यानेच विश्वासघात करत माजी नगरसेवकाच्या  घरातून तब्बल ७४ लाख ५० हजारांची रोकड व १२ हजारांची सोन्याची रिंग व चांदीचे नाणे चोरले.

- धीरज परब मीरारोड - सुमारे २० वर्षांपासून ज्याच्या साठी सर्वती मदत केली त्यानेच विश्वासघात करत माजी नगरसेवकाच्या  घरातून तब्बल ७४ लाख ५० हजारांची रोकड व १२ हजारांची सोन्याची रिंग व चांदीचे नाणे चोरले. परंतु गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला मंगळवारी अटक करत सर्व ऐवज हस्तगत केला आहे.

मीरारोडच्या शीतल नगर मध्ये राहणारे केबल - इंटरनेट व्यावसायिक तसेच माजी नगरसेवक असलेले राजीव मेहरा राहतात.  कामा निमित्त बाहेर गेलेले मेहरा रात्री घरी परतले असता अज्ञात चोरटयाने घराच्या गच्चीचा दरवाजा कापून आत प्रवेश करत कपाटाचा दरवाजा कापुन लॉकरमध्ये ठेवलेली ७४ लाख ५० हजार रोख रोख व सोन्या- चांदीचे १२ हजाराचे दागिने चोरले.  मीरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता गुन्हे शाखेचे उपायुक्त अविनाश अंबुरे यांच्या  मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष १ चे पोलिस निरीक्षक अविराज कुराडे, सहायक निरीक्षक कैलास टोकले व  पुष्पराज सुर्वे सह राजु तांबे, संदीप शिंदे, किशोर वाडीले, संजय पाटील,  अविनाश गर्जे, संजय शिंदे, संतोष लांडगे, विजय गायकवाड, सचिन सावंत, प्रफुल्ल पाटील, विकास राजपूत, प्रशांत विसपुते, संतोष चव्हाण यांच्या पथकाने तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषणाव्दारे आरोपी संजीवकुमार सदानंद सिंह  रा. शितलनगर, मीरारोड याला २५ एप्रिल रोजी अटक केली. पोलिसांनी त्याच्या कडून  ७४ लाख ५० हजार  रोख रक्कम व १२ हजारांचे सोन्याची बाली व  चांदीचा कॉईन असा मुददेमाल हस्तगत केला आहे.

आरोपी सिंह हा सुमारे २० वर्षां पासून मेहरा यांच्या सोबत होता. त्याला रहायला घर मेहरा यांनी ते रहात असलेल्या इमारतीतच दिले आहे. घरखर्च सुद्धा मेहरा देत होते. आरोपीच्या कुटुंबातील एका आजारी व्यक्तीचा उपचार खर्च मेहरा हेच करत होते.  तरी देखील विश्वासघात करून सिंह याने चोरी केल्याने खळबळ उडाली आहे.

विशेष म्हणजे चोरी केल्या नंतर देखील सिंह हा मेहरा सोबतच फिरत होता. पोलिस तपासात सुद्धा तो बरोबर असायचा. परंतु सीसीटीव्ही फुटेज मध्ये तो घटने दरम्यान इमारतीच्या बाहेर जाताना आढळून आला नाही आणि पोलिसांनी चौकशी सुरू करत त्याला अटक केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीmira roadमीरा रोड