शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

मिरारोड : मुख्य रस्त्यालगतच्या सरकारी जागेवरील अतिक्रमण हटवून पार्किंगसाठी वापर करण्यास टाळाटाळ

By धीरज परब | Updated: January 14, 2023 17:17 IST

काशीमीरा नाका ते भाईंदर फाटक पर्यंतचा छत्रपती शिवाजी महाराज मार्ग हा शहराचा मुख्य रस्ता आहे.

मीरारोड - शहराच्या मुख्य रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी आणि पार्किंगची जागा नाही. दरम्यान, बेकायदा रस्त्यावर होणारी पार्किंग समस्या सोडवण्यासाठी गौरव गार्डन कॉम्प्लेक्स समोर असलेली सरकारी जागा पार्किंग सुविधेसाठी घेण्यास महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी कमालीची टाळाटाळ चालवली आहे. 

काशीमीरा नाका ते भाईंदर फाटक पर्यंतचा छत्रपती शिवाजी महाराज मार्ग हा शहराचा मुख्य रस्ता आहे. सदर रस्त्यावर आधीच वाहनांची मोठी वर्दळ असते जेणेकरून वाहन कोंडी पाचवीला पुजलेली आहे. त्यातच मेट्रोचे काम सुरू झाल्या पासून रस्ता अरुंद होऊन वाहतूक कोंडी प्रचंड वाढली आहे. तर ह्या मुख्य रस्त्यावर नो पार्किंग असून देखील दोन्ही बाजूला बेकायदेशीर वाहन पार्किंग केली जात असल्याने समस्या आणखी गंभीर बनली आहे. 

ह्याच मुख्य रस्त्यावर असलेल्या  तुंगा रुग्णालय, गौरव गार्डन कॉम्प्लेक्स व जे बी डेकोर आदी बांधकामांच्या समोरची असलेली मोकळी जागा ही सरकारी आहे . सदर सरकारी जागेवर अतिक्रमण करण्यात आले आहे. त्याचा वाणिज्य वा अन्य फायद्या साठी बेकायदेशीर वापर केला जात आहे. तसे असताना ह्या जागेवरील अतिक्रमण महापालिका जाणीवपूर्वक हटवत नाही. तर महसूल विभागाने देखील अतिक्रमण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केलेले नाहीत. 

सदर जागा बहुतांश मोकळी असून त्याठिकाणी वाहनतळ उभारल्यास मोठ्या प्रमाणात वाहन पार्किंगची सुविधा उपलब्ध होऊन रस्त्यावर होणारी बेकायदा पार्किंग थांबू शकते. नागरिकांची मोठी सोय होणार आहे. शिवाय पालिकेला उत्पन्न देखील मिळू शकते. मात्र महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी मात्र सदर जागा वाहनतळ साठी वापरात आणण्यास कमालीची टाळाटाळ चालवली आहे. एरव्ही नागरी सुविधां साठी जागा नसल्याची ओरड करणारे देखील सरकारी जागा असून सुद्धा चिडीचुप आहेत. 

नंदकिशोर देशमुख ( अपर तहसीलदार, मीरा भाईंदर ) - महापालिकेने सदर सरकारी जमीन वाहनतळ साठी मागितल्यास तसा प्रस्ताव वरिष्ठांना पाठवता येईल. परंतु पालिकेने अजून तरी तशी मागणी केलेली नाही. 

 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर