धीरज परब/ मीरारोड - भाईंदर पूर्वेच्या तलाव रोड भागात भर नागरी वसाहतीत बिबट्या आल्याने लोकांमध्ये एकच घबराट माजली आहे. बिबट्या याने तीन जणांना जखमी केल्याचे प्राथमिक वृत्त आहे. बिबट्या हा सध्या पारिजात इमारतीमध्ये असून अग्निशमन दलाने एका जखमी मुलीस सुखरूप बाहेर काढले आहे.
आज सकाळची ही घटना असून बिबट्या अजूनही पारिजात इमारतीमध्ये आहे. दरम्यान, सकाळपासून बिबट्याला पकडण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. पारिजातमधील एका घरात बिबट्या जेरबंद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
आज सकाळी मीरा-भाईंदरच्या तलाव रोड परिसरातील पारिजात नावाच्या बिल्डींगमध्ये हा बिबट्या शिरला. त्या इमारतीच्या आवारात बिबट्याचा वावर असल्याचे आढळून आले. मीरा-भाईंदरच्या बीपी रोड मागच्या तलावरोड परिसरातील साईबाबा हॉस्पिटलच्या शेजारी असलेल्या पारिजात इमारतीत आज सकाळी ८ च्या सुमारास हा बिबट्या दिसला. तेथील एका घरात हा बिबट्या थेट घुसला, तेव्हा घरात ४ माणसं होती. तिथे घरात २५ वर्षांची एक तरूणी आणि काही पुरूष होते. त्या घरात शिरलेल्या बिबट्याने सर्वांवर हल्ला चढवला. त्यांचे आवाज, आरडाओरडा ऐकून आजूबाजूच्या लोकांना ही घटना समजली.
Web Summary : A leopard strayed into a residential area of Mira Road-Bhayandar East, injuring three people. The animal is currently inside Parijat building. Firefighters rescued an injured girl. The incident occurred this morning.
Web Summary : मीरा रोड-भाईंदर पूर्व के रिहायशी इलाके में तेंदुआ घुस गया, जिससे तीन लोग घायल हो गए। तेंदुआ फिलहाल परिजात इमारत के अंदर है। दमकल कर्मियों ने एक घायल लड़की को बचाया। घटना आज सुबह हुई।